Home /News /entertainment /

Trailer Launch : सैफ अली खानला व्हायचंय पंतप्रधान; खुर्चीसाठी रंगणार 'तांडव'

Trailer Launch : सैफ अली खानला व्हायचंय पंतप्रधान; खुर्चीसाठी रंगणार 'तांडव'

सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) बहुप्रतिक्षित तांडव (Tandav Tralier) सीरिजचा ट्रेलर लाँच झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.

  मुंबई, 04 जानेवारी : अभिनेता सैफ अली खानने (Saif Ali Khan) आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मोठ्या पडद्यावर काम करतानाच डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळणाऱ्या काही अभिनेत्यांमध्ये त्याचं नाव आघाडीवर घेतलं जातं. त्याच्या सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझनही बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. आता त्याची मोस्ट अवेटेड वेब सीरिज लवकरच रीजिल होणार आहे. त्याच तांडव (Tandav Trailer) या वेब सीरिजचा ट्रेलर आज रीलिज करण्यात आला. तांडवच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्या वेब सीरिजमध्ये सैफ अली खानसोबतच डिंपल कपाडिया, तिग्मांशु धूलिया आणि सुनील ग्रोवर यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. सीरिजची कथा पूर्णपणे राजकारणावर आधारित आहे. खुर्ची मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असणाऱ्या लोकांमध्ये कसा संघर्ष रंगतो अशी रंजक कथा या वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. तांडवचं दिग्दर्शन अली अब्बास जफर आणि निर्माते हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर आहेत. ही वेब सीरिज 9 भागांची असेल.
  तांडवमधून डिम्पल कपाडिया पहिल्यांदाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर झळकणार आहेत. तांडव 15 जानेवारी 2021 रोजी भारतासोबतच इतर 200 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. Amazon Prime या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'तांडव'चा घरबसल्या आनंद घेता येणार आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Saif Ali Khan

  पुढील बातम्या