Home /News /entertainment /

रामायणातील 'या' प्रसंगाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सैफ अली खानवर भडकले लोक

रामायणातील 'या' प्रसंगाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सैफ अली खानवर भडकले लोक

सैफ अली खानवर पुन्हा एकदा लोकांनी जोरदार टीका केली आहे व त्याला चित्रपटाबाहेर करण्याची मागणीही केली जात आहे

    मुंबई, 5 डिसेंबर : सैफ अली खान हा ओम राऊतच्या सुपरहिट चित्रपट 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' मध्ये व्हिलनच्या भूमिकेत दिसला होता. सैफच्या या पात्राला चाहत्यानी पसंत केले होते. मात्र इतिहासाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. ओम राऊतच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात सैफ पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झालेलं नाही, परंतु आपल्या वक्तव्यामुळे सैफ पुन्हा एकदा वादात सापडला आहे. प्रभास आणि कृती सैनन चित्रपटात ओम राऊत रामायणाच्या गोष्टीवर आधारित आदिपुरुष चित्रपटासाठी मोठा खर्च करीत आहेत. या चित्रपटात भगवान रामाची भूमिका बाहुबली स्टार प्रभास, सीतेच्या भूमिकेत कृती सैनन आणि लंकेश वा रावण याच्या रोलमध्ये सैल अली खान दिसणार आहे. चित्रपटासंदर्भात सैफ अली खानने केलेल्या एका वक्तव्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  आणि सोशल मीडियावर #BoycottAdipurush ट्रेंड केला जात आहे. काय म्हणाला सैफ? अलीकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने 'आदिपुरुष' मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हटले की, या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. तो म्हणाला, ' एक अशा राक्षस राजाची भूमिका वठवणं रंजक आहे. यामध्ये सीताचं अपहरणाच्या औचित्यातून रावणाची रामासोबत लढाई सूड उगविण्यात दाखवली जाईल, जी लक्ष्मणाने रावणाची बहिण शुर्पणखाचं नाक कापल्यामुळे सुरू झाली होती. सैफच्या वक्तव्यावर भडकले लोक मुलाखतीतील सैफच्या वक्तव्यामुळे लोक भडकले आहे. रावणाने सीतेचं केलेल्या अपहरणाचं समर्थन कसं केलं जाऊ शकतं, असा सवाल उपस्थित करीत आहे. यानंतर #BoycottAdipurush आणि #WakeUpOmRaut ट्विट करीत चित्रपटावर बहिष्कार घालत आहेत. अनेकांनी सैफ अली खानला चित्रपटातून बाहेर करण्याची मागणी केली आहे. अद्याप चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झालेलं नाही, मात्र 11 ऑगस्ट 2022 रोजी हा चित्रपट रिलीज करण्याची योजना आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Saif Ali Khan

    पुढील बातम्या