मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /लग्नाआधी सैफने अमृता सिंहला लिहिलं होतं पत्र; करीनासमोर गुपित उघडताच...

लग्नाआधी सैफने अमृता सिंहला लिहिलं होतं पत्र; करीनासमोर गुपित उघडताच...

saif ali khan

saif ali khan

सैफ अली खाननं (saif ali khan) आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एक मोठा असा खुलासा केला आहे.

मुंबई, 08 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) लवकरच दुसऱ्यांदा आईवडील बनणार आहेत. बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारं हे सेलिब्रिटी कपल आहे. सैफ अली खानने 16 ऑक्टोबर 2012 ला करीना कपूरसोबत लग्न केलं. त्याआधी त्याने अमृता सिंह (Amrita Singh) बरोबर लग्न केलं होता. पण दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर अनेक वर्षांनी त्यानं करीना कपूरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधी त्यानं पहिली पत्नी अमृताला एक पत्र लिहिलं होतं.

करीना कपूरबरोबर लग्न करण्याआधी सैफ अली खान यानं पहिली पत्नी अमृताला एक पत्र लिहिलं होतं आणि याबाबत त्यानं करीना कपूरलाही सांगितलं. करीना कपूरसमोर सैफचं हे गुपित उघडताच तिची नेमकी काय प्रतिक्रिया होती हे सैफनं एका कार्यक्रमात सांगितलं आहे.

नुकतंच सैफ अली खान यानं करण जोहरच्या कॉफी विथ करण (Koffee with Karan) या कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. या कार्यक्रमात सैफ आपली मुलगी सारा (Sara Ali Khan) हिच्याबरोबर आला होता. यावेळी त्याने हा किस्सा शेअर केला होता. लग्नाच्या आधी सैफनं अमृता हिला पत्र लिहिण्याचा विचार करीनाला बोलून दाखवला. यावर तिनं अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया देत त्याला यामध्ये मदत केल्याचं सैफनं या कार्यक्रमात सांगितलं. याचबरोबर सारानं (Sara Ali Khan) सैफच्या दुसऱ्या लग्नात अमृतानंच सैफला तयार करून पाठवल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात सारानं आपल्या आणि करीनाच्या नात्यावरदेखील भाष्य केलं. करीना आणि आपलं नातं अतिशय चांगलं असल्याचं आणि आमच्यामध्ये चांगलं बॉण्डिंग असल्याचं ती म्हणाली.

हे वाचा -  Taarak Mehta Ka Ooltah Chasmah च्या सेटवरुन आली GOOD NEWS! अखेर चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार!

सैफ अली खाननं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच 1991 अमृता सिंहबरोबर लग्न केलं होतं. त्याने 1993 मध्ये परंपरा या बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू केला होता. पण लग्नानंतर काही वर्षांतच दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. 2004 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता. सैफ आणि अमृता यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही 2 मुलं आहेत. सारानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून इब्राहिम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की नाही याविषयी अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Karan Johar, Kareena Kapoor, Saif Ali Khan, Sara ali khan