Home /News /entertainment /

क्वारंटाईनमध्ये करिनाने असा घेतला पती सैफसोबत कॉफी डेटचा आनंद, Photo viral

क्वारंटाईनमध्ये करिनाने असा घेतला पती सैफसोबत कॉफी डेटचा आनंद, Photo viral

कोरोनाची लागण (kareena kapoor covid positive ) झाल्यानंतर क्वारंटाईनमध्ये वेळ घालवणाऱ्या करीना कपूरच्या तब्येतीवर सैफ बारीक लक्ष ठेवून आहे.

    मुंबई, 16 डिसेंबर : बी-टाउनचे रॉयल कपल सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्यातील प्रेम नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आजही एकाद्या नव्या जोडप्याप्रमाणे दोघंही एकमेंकावर तितकच प्रेम करतात. याचा पुरावा करीना कपूरने इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर करत दिला आहे. कोरोनाची लागण (kareena kapoor covid positive ) झाल्यानंतर क्वारंटाईनमध्ये वेळ घालवणाऱ्या करीना कपूरच्या तब्येतीवर सैफ बारीक लक्ष ठेवून आहे. करीना कपूरने शेअर केला सैफचा फोटो करिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये एकच दिसत आहे की, दूर राहून देखील तो पत्नीच्या तब्येतीची कशीकाळजी घेतोय. करिनाने इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात सैफ अली खान तिच्या घरासमोरील टेरेसवर उभा राहून कॉफी पीत आहे. दुरूनच तो करिनासोबत कॉफी डेटचा आनंद घेत आहे. पोस्टमध्ये करीना कपूरने लिहिले आहे, ठीक आहे, आजही आम्ही कोरोनाच्या काळातही एकमेकांच्या प्रेमात आहोत. ते अजिबात विसरू नका. हे लपलेले आहे. फोटोत टेरेसवर सैफ अली खानच्या मागे, त्याचा बॉडीगार्ड मास्क घालून उभा आहे. करीना कपूर खानने हा फोटो शेअर करताच तो व्हायरल होऊ लागला आहे. करीना कपूर खानला कोरोना झाला तेव्हा सैफ अली खान गेल्या 1 आठवड्यापासून मुंबईबाहेर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तो शहरात नव्हता, यात कितपत तथ्य आहे हे माहीत नाही. मात्र सैफ दूर राहून करिनाची काळजी घेत असल्याचे पाहून चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. वाचा -राखीने-शमिताला चक्क 'ब्रा'मध्ये वस्तू लपवण्याचा दिला सल्ला, मग झालं असं... करीना कपूर खानसोबत तिची मैत्रिण अमृता अरोरा हिलाही कोरोना झाला आहे. दोघेही करण जोहरच्या घरी आणि रिया कपूरच्या घरी गेट टुगेदरमध्ये सहभागी झाल्या होत्या. तेथून दोघींनाही कोरोनाची लागण झाली. करीना आणि अमृता बऱ्या होत आहेत आणि योग्य ती काळजी घेत आहेत. दोघींमध्ये कोरोनाची कमी लक्षणे आढळून आली. करीना होम आयसोलेशनमध्ये आहे. करीना लवकर बरी होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. वाचा -'मच्छरादाणी घातलीस काय?' उर्फी जावेद पुन्हा कपड्यावरू ट्रोल करीना कपूर नंतर अमृता अरोरा, सीमा खान, महिप कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांना करण जोहरच्या पार्टीत कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. या पार्टीत आलिय व मलायका अरोरा देखील होती. मात्र करणसह त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Kareena Kapoor

    पुढील बातम्या