जे विरुष्कानं केलं तेच सैफिनाही करणार; आपल्या बाळाबाबत घेतला मोठा निर्णय

जे विरुष्कानं केलं तेच सैफिनाही करणार; आपल्या बाळाबाबत घेतला मोठा निर्णय

विराट कोहली (Virat kohali) आणि अनुष्का शर्मानंतर (Anushka sharma) आता करीना कपूर (Kareena kapoor) आणि सैफ अली खान (Saif ali khan) या सेलिब्रिटी कपलच्या बाळाची प्रतीक्षा सर्वांना आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : क्रिकेटर विराट कोहली (virat kohli)  आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानंतर  (anushka sharma) आता अभिनेत्री करीना कपूर  (kareena kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif ali khan) हे सेलिब्रिटी कपल लवकरच आई-बाबा होणार आहे. करीना कपूर फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या जन्मानंतर विरुष्कानं जे केलं आहे, ते सैफिनाही करणार आहेत, अशी माहिती मिळते आहे.

सेलिब्रिटीजच्या (Celebrities) वैयक्तिक आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. अनेक सेलिब्रिटीज सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपल्या चाहत्यांसाठी वैयक्तिक आयुष्यातील घटना, गोष्टी शेअर करत असतात. सध्या सेलिब्रिटीजची लहान मुले हा चाहत्यांच्या आकर्षणाचा विशेष केंद्रबिंदू ठरताना दिसतो. सोशल मीडियावर या मुलांचे फोटो, व्हिडीओला विशेष पसंती मिळताना दिसते. त्यामुळे असे फोटो मिळवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी छायाचित्रकार (Paparazzi) विशेष प्रयत्न करताना दिसून येतात.

हे वाचा - 'त्याने जियाला टॉप उतरवायला सांगितला...' Jiah Khan च्या बहिणीचा साजिद खानवर आरोप

या पार्श्वभूमीवर, कृपया आमच्या नवजात बाळाचे (मुलीचे) फोटो काढू नका, अशी विनंती विरुष्कानं फोटोग्राफर्सलाकेली. आपल्या नव्या आमच्या बाळाच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा, अशी विनंती करणारे पत्र या दाम्पत्यानं पापाराझ्झींना लिहिलं. करीना आणि सैफ अली खानही आपल्या दुसऱ्या बाळाच्या बाबतीत हेच करणार आहे.

करीना आणि सैफ यांचा पहिला मुलगा तैमूर अली खान नेहमीच चर्चेत राहिला आहे. पण आपल्या दुसऱ्या मुलाच्या बाबतीच हे कपल असं काही होऊ देणार नाही आहे. आपल्या दुसऱ्या बाळाच्या प्रायव्हसीबाबत ते कठोर पावलं उचलणार आहेत, अशी माहिती मिळते आहे.

हे वाचा - पहिल्यांदाच समोर आला शाहिदच्या पत्नीचा BOLD लुक; मीरा राजपूतचे PHOTOS व्हायरल

रिपोर्टनुसार स्पॉटबॉयला कपलच्या एका जवळच्या फ्रेंडनं दिलेल्या माहितीनुसार, कपलनं आम्हाला घरी येऊ नये, असं सांगितलं आहे आणि आम्ही त्यांच्या निर्णयाचा मान राखला. खरंतर जे स्टार्स नेहमी आपल्या मुलांच्या आजूबाजूला पापाराझ्झी असल्याची तक्रार करतात ते कधीच त्यांना आपल्या मुलांपासून दूर करण्याचा प्रयत्न करत नाहीत. कारण फोटोग्राफर्सदेखील माणसं आहेत. त्यांना फक्त इतकंच सांगायचं असतं की एका सेलिब्रिटीच्या प्रायव्हेसीचा आदर राखा.

Published by: Priya Lad
First published: January 19, 2021, 4:01 PM IST

ताज्या बातम्या