दुसरा राजकुमार लवकरच येणार कॅमेऱ्यासमोर; करीना करतेय जोरदार तयारी

दुसरा राजकुमार लवकरच येणार कॅमेऱ्यासमोर; करीना करतेय जोरदार तयारी

सैफ अली खान आपला मोठा मुलगा तैमुरसोबत (Taimur) करीनाला घरी नेण्यासाठी रुग्णालयात आला होता. यावेळचे काही फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. परंतु चाहत्यांनी अद्याप सैफ-करीनाच्या बाळाचा चेहरा पाहिलेला नाही.

  • Share this:

मुंबई 28 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) हिच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला. करीना आणि सैफ (Saif Ali Khan) यांना पूत्ररत्नाचा लाभ झाला आहे. दरम्यान नुकतीच करीनाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सैफ अली खान आपला मोठा मुलगा तैमुरसोबत (Taimur) करीनाला घरी नेण्यासाठी रुग्णालयात आला होता. यावेळचे काही फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. परंतु चाहत्यांनी अद्याप सैफ-करीनाच्या बाळाचा चेहरा पाहिलेला नाही.

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळं करीना आपल्या बाळाच्या बाबतीत प्रचंड सतर्क आहे. अनेक नामांकित बॉलिवूड सेलिब्रिटींनाही तिनं अद्याप आपल्या घरात घेतलेलं नाही. परंतु चाहत्यांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार करीना एका व्हर्चुअल लाईव्ह व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे आपल्या बाळाची ओळख करुन देणार आहे. परिणामी चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

अवश्य पाहा - शर्मिला टागोर नातवापासून दूर; का नाही पाहिला करीनाच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा?

लॉकडाऊनमध्ये करीना कपूर हिच्या प्रेग्नेसींबाबत अनेक चर्चा समोर येत होत्या. करीना कपूर हिला मुंबईती ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी करीनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सैफ आणि करीनाने याबाबत मीडियाला माहिती दिली. 2016 मध्ये तैमूरच्या जन्मानंतर यावर्षी लॉकडाऊनमध्ये करीनाना प्रेग्नेंट होती.

Published by: Mandar Gurav
First published: February 28, 2021, 1:24 PM IST

ताज्या बातम्या