घटस्फोटानंतर अमृतानं मागितले ‘इतके’ कोटी, सैफनं हप्त्यांमध्ये चुकवली रक्कम

घटस्फोटानंतर अमृतानं मागितले ‘इतके’ कोटी, सैफनं हप्त्यांमध्ये चुकवली रक्कम

सैफनं 1991 मध्ये स्वतःहून 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंहशी लग्न केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : बॉलिवूडचा नवाब म्हणजे सैफ अली खान आज 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या सिनेमांपेक्षा सैफ त्याच्या पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत राहला. पण सैफचं पहिला संसर मोडला त्यावेळी वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा झाल्या. पण यावर अमृता आणि सैफनं नेहमीच मौन बाळगणं पसंत केलं. मात्र अनेक वर्षांनंतर सैफनं एका मुलाखतीत अमृतानं घटस्फोटाच्या वेळी त्याच्याकडे मागितलेल्या रक्कमेविषयीचा खुलासा केला होता. एवढं नाही तर त्यावेळी तो कठिण काळातून जात असल्यानं अमृतानं मागितलेली रक्कम एकाचवेळी देणं त्याला शक्य नव्हतं. त्यामुळे ही रक्कम त्यानं हप्त्यांमध्ये अमृताला दिली होती. असंही या मुलाखतीत सैफनं सांगितलं होतं. सैफ आणि अमृताचं लग्न 13 वर्ष टिकलं आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा घटस्फोट घेतला त्यावेळी सर्वजण अवाक झाले होते.

सैफनं 1991 मध्ये  स्वतःहून 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंहशी लग्न केलं होतं. या दोघांची पहिली ओळख 'बेखुदी' सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी अमृता बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री होती. या सिनेमातून सैफ त्याचा बॉलिवूड डेब्यू करत होता. असं म्हटलं जातं की, या दोघंही पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अमृता आणि सैफची पहिली डेट अमृताच्या घरी झाली. तो अमृताच्या घरी पोहोचला त्यावेळी अमृतानं अजिबात मेकअप केला नव्हता आणि सैफ तिच्या सिंपल लुकवर फिदा झाला होता.

राज की बात चिठ्ठीतून समोर! करीनासोबत लग्नाच्या दिवशीच सैफनं अमृताला लिहीलं पत्र

सैफ-अमृता प्रेमात एवढे अखंड बुडाले होते की, त्यांनी घराच्यांची परवानगी न घेताच लग्न केलं. या दोघांना दोन मुलंही झाली सारा आणि इब्राहिम. असं म्हटलं जातं की, एका परदेश दौऱ्याच्यावेळी सैफच्या आयुष्यात इटालियन मॉडेल रोज आली आणि तिच या दोघांच्या घटस्फोटाचं कारण बनली. 2004 मध्ये सैफ आणि अमृतानं घटस्फोट घेतला. त्यानंतर अनेक वर्षांनी एका मुलाखतीत सैफनं अमृताला पोटगी म्हणून आपण 5 कोटी रुपये दिल्याचा खुलासा केला. तो म्हणला, ‘त्यावेळी मी आयुष्यातला कठिण काळातून जात होतो. एवढी मोठी रक्कम एकाचवेळी देणं मला त्यावेळी शक्य नव्हतं. त्यामुळे हे पैसे मी काही हप्त्यांमध्ये अमृताला दिले होते. याशिवाय इब्राहिम मोठा होईपर्यंत प्रत्येक महिन्याला मी 1 लाख रुपये देईन असं आश्वासनही मी तिला दिलं होतं.’

अनुष्का शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल प्रभास म्हणतो, आम्ही दोघंही...

अमृतापासून वेगळं झाल्यानंतर सैफनं 2012 मध्ये अभिनेत्री करीना कपूरशी लग्न केलं. करीना सैफपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. सैफची मुलगी सारानं मागच्याच वर्षी केदारनाथ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. त्यानंतर रणवीर सिंह सोबत ती सिंबामध्येही दिसली आणि पदार्पणातील तिचे दोन्ही सिनेमे हिट ठरले. आता पाहिलं तर अमृता आणि सैफ आपापल्या आयुष्यात खूश आहेत. एवढंच नाही तर सारा आणि करीनामध्ये एक वेगळंच बॉन्डिंग पाहायला मिळतं. याशिवाय सैफ-करीनाच्या लग्नाला सारा आणि इब्राहिम हजर होते.

याड लागलं! भूमि पेडणेकर बॉलिवूडच्या या हिरोला करतेय डेट?

=============================================================

शहीद जवानाच्या पत्नीचा असा सन्मान पाहून तुमचेही डोळे पाणावतील, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 12:38 PM IST

ताज्या बातम्या