मुंबई, 25 जानेवारी : बॉलिवूडमध्ये सध्या बिग बजेट सिनेमांची जोरदार चर्चा सुरू आहे. या दरम्यान एकीकडे अभिनेता सैफ अली त्याचा आगामी सिनेमा ‘जवानी जानेमन’च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. तर दुसरीकडे त्याची मुलगी सारा अली खान तिचा सिनेमा ‘लव्ह आज कल’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. ‘जवानी जानेमन’मध्ये सैफ हटके आणि कूल वडीलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री अलाया फर्नीचरवाला सिनेमात सैफच्या मुलीची भूमिका साकारत आहे. पण ही भूमिका सुरुवातीला सैफची लेक साराला ऑफर झाली होती. पण नंतर तिनं या सिनेमातून माघार घेतली. यावर आता साराला या सिनेमात संधी द्यायचीच नव्हती असा धक्कादायक खुलासा सैफ अली खाननं केला आहे.
सैफ अली खानच्या ‘जवानी जानेमन’ सिनेमात त्याच्या रील लाइफ मुलीची भूमिका अलाया साकरत आहे. ती या सिनेमातू बॉलिवूड डेब्यू करत आहे. अलायानं या सिनेमात सारा अली खानला रिप्लेस केलं. पण सारानं या सिनेमाला नकार का दिला याबाबत चाहत्यांच्या मनात बरीच उत्सुकता आहे. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत साराचे वडील म्हणजेच अभिनेता सैफ अली खाननं याबाबतचा धक्कादायक खुलासा केला. या खास सिनेमात मला साराला संधी द्यायचीच नव्हती अशी प्रतिक्रिया या मुलाखातीत सैफनं दिली आहे.
प्रार्थनेच्या वेळी लॉलीपॉप खात होता मुलगा, असा Video की अनुपम खेरही झाले इमोशनल
View this post on Instagram
सैफ म्हणाला, ‘जेव्हा सारानं या सिनेमासाठी होकार दिला होता. त्यावेळी तिचा पहिलाच सिनेमा ‘केदारनाथ’ जवळपास बंद होण्याच्या मार्गावर होता आणि तिच्याकडे त्यावेळी दुसरा कोणताच सिनेमा नव्हता. त्यामुळे वडीलांच्या नात्यानं मी तिला ‘जवानी जानेमन’ ऑफर केला होता. पण नंतर के’दारनाथ’ला अनपेक्षितपणे चांगलं यश मिळालं आणि यासोबतच तिला ‘सिंबा’ मिळाला. मग मीच तिला जवानी जानेमन सोडण्याचा सल्ला दिला. मी तिला म्हणालो, तू आता रणवीर आणि वरुणसारख्या अभिनेत्यांसोबत काम करायला हवं.’
कोण आहे नवं इंटरनेट सेन्सेशन बाबा जॅक्सन? 'स्ट्रीट डान्सर'च्या टीमलाही दिला झटका
View this post on Instagram
सैफच्या जवानी जानेमन बद्दल बोलायचं तर या सिनेमात सैफ एका अशा व्यक्तीची भूमिका साकारत आहे जो त्याचं आयुष्य मजेत आणि एन्जॉय करत घालवत असतो. अचानक एक दिवस त्याला समजतं की तो एका मुलीचा बाप आहे. नंतर ही मुलगी त्याच्या लाइफमध्ये येते. या सिनेमात अलायानं त्याच्या मुलीची तर अभिनेत्री तब्बूनं त्याच्या पत्नीची भूमिका साकरली आहे. हा सिनेमा 31 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सनी लिओनीसोबत रोमान्स करताना दिसणार Bigg boss 13चा हा स्पर्धक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Saif Ali Khan, Sara ali khan