बाप-लेकीत कोण बेस्ट? 10 वर्षांनंतरच्या Love Aaj Kal वर सैफनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया

बाप-लेकीत कोण बेस्ट? 10 वर्षांनंतरच्या Love Aaj Kal वर सैफनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनच्या 'लव्ह आज कल'चा ट्रेलर रिलीज झाल्यावर सैफ आणि साराच्या सिनेमाची तुलना केली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी : सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा बहुचर्चित सिनेमा ‘लव्ह आज कल’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा ट्रेलर पाहिल्यावर प्रेक्षक याला सैफ आणि दीपिकाच्या ‘लव्ह आज कल’ची कॉपी असल्याचं बोलत आहेत. एकंदर सारा-कार्तिकच्या सिनेमाच्या ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता या ओरिजनल सिनेमाचा हिरो सैफ अली खानची या ट्रेलरवर प्रतिक्रिया आली आहे.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सैफनं लेकीच्या सिनेमाच्या ट्रेलवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सैफनं स्वतःच्या सिनेमाच्या तुलनेत साराचा सिनेमा कमजोर असल्याचं म्हटलं आहे. सैफनं त्याला 2009 मध्ये दीपिकासोबत आलेला ओरिजिनल ‘लव्ह आज कल’ जास्त आवडल्याचं म्हटलं. पण यासोबतच त्यानं कार्तिक साराला त्यांच्या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आणि इम्तियाज अली यांच्या या वेगळ्या प्रयोगाचं कौतुकही केलं.

सैफच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला तान्हाजी : द अनसंग वॉरियर हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. या सिनेमात सैफनं उदयभान राठौड या खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्याच्या या भूमिकेचं खूप कौतुकही केलं जात आहे. या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत असला तरीही सैफ प्रेक्षकांवर आपली वेगळी छाप सोडण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे तो आता मुख्य भूमिकेतून कमबॅक कधी करणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

सारा आणि कार्तिकच्या लव्ह आज कल बद्दल बोलायच तर या सिनेमात दोन वेगवेगळ्या काळातील कथा साकारण्यात आली आहे. ज्यात 90 व्या दशकातील भागात आरुषी शर्मा दिसत आहे तर मॉर्डन कहाणीमध्ये सारा अली खान आहे. सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं असून 2009 मध्ये आलेल्या त्यांच्या लव्ह आज कलचा हा दुसरा भाग आहे. यात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. सारा आणि कार्तिकचा लव्ह आज कल 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

First published: January 18, 2020, 11:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading