बालदिवस स्पेशलच,सैफने घेतली तैमुरसाठी 1.03 कोटीची लक्झरी कार !

बालदिवस स्पेशलच,सैफने घेतली तैमुरसाठी 1.03 कोटीची लक्झरी कार !

आता पुढच्या महिन्यात तैमूरचा बर्थडे आहे. तो एक वर्षाचा होणार आहे. सैफ आणि करिना त्यांच्या मुलाच्या बर्थडेची जोरदार तयारी करत आहे.

  • Share this:

14 नोव्हेंबर : आजचा बालदिवस जगभरात साजरा होत असताना बॉलिवूडच्या छोट्या उस्तादाला म्हणजेच तैमूर खानला आपण कसं विसरु शकतो. आजचा बालदिवस तैमूरसाठी एकदम खास ठरला आहे.

कारण सैफ अली खानने त्याला 1.03 कोटींची लक्झरी कार गिफ्ट केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सैफ 'ग्रँड चेरोकी एसआरटी' या कारच्या एका कार्यमक्रमात गेला होता. त्यात त्याला ही कार खूप आवडली आणि त्याने ती विकत घेतली.

असं बोललं जातं की, या कारची किंमत 1.07 कोटी इतकी आहे पण सैफने ती 1.03 कोटीला विकत घेतली आहे.

या कारबद्दल सांगताना सैफ म्हणाला की, 'या कारमध्ये मागच्या सीटावर 'बेबीसीट' आहे. त्यामुळे मी तैमूरला आरामशीर फिरायला घेऊन जावू शकतो.

मी ही गाडी त्याला देऊ इच्छितो. आशा आहे की, तैमूरला ही लाल रंगाची चेरी रेड जीप आवडेल. मी ही गाडी तैमूरसाठी ठेवणार आहे.'

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये तैमूरच्या लोकप्रियतेबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यात तो म्हणाला की, 'तैमूर आतापासूनच स्टार बनला आहे. तो जिथे जाईल तिथे लोक त्याचे फोटो काढायला येतात. त्याच्या प्रसिद्धीसोबतच त्याची जबाबदारीही आता वाढतं आहे. पुढे जाऊन त्याला ही जबाबदारी सांभाळावी लागेल.'

पण तैमूर ज्या पद्धतीने फोटोसाठी लूक देतो त्यावरुन तो त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा तर पूर्ण करतोय हेच म्हणावं लागेल.

आता पुढच्या महिन्यात तैमूरचा बर्थडे आहे. तो एक वर्षाचा होणार आहे. सैफ आणि करिना त्यांच्या मुलाच्या बर्थडेची जोरदार तयारी करत आहे.

त्यामुळे आता त्याच्या बर्थडेला त्याला गिफ्ट मिळणार याच्या उत्सुकतेतेच त्याचे चाहते आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2017 08:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading