मुंबई, 12 ऑगस्ट : अभिनेता सैफ अली खानसाठी (saif ali khan) आजचा दिवस खूपच खास ठरला आहे. आज त्याची मुलगी सारा अली खानचा (sara ali khan) वाढदिवस आहे. सारा 25 वर्षांची झाली आहे. तर सैफच्या घरात आणखी एक नवा पाहुणा येणार आहे. करीना कपूर (kareena kapoor) आई होणार आहे. सैफने ही आनंदाची बातमी दिली आहे.
अभिनेत्री सारा अली खान आपला 25 वा वाढदिवस साजरा करते आहे. त्यानिमित्ताने तिची सावत्र आई करीना कपूरने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने आपल्या इन्स्टाग्रामवर सारासाठी पोस्ट केली आहे. तिने साराच्या लहापणीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सारा तिचे वडील सैफसह आहे.
शिवाय साराच्या वाढदिवशी सैफ आणि करीनाने या सेलेब्रिटी जोडीने एक गूड न्यूज दिली आहे. तैमूर अली खाननंतर (Taimur ali khan) आता आपण आणखी एका पाहुण्याला कुटुंबात स्थान देण्यासाठी उत्सुक असल्याचं सैफ आणि करीनाने जाहीर केलं आहे. गेले कित्येक दिवस बॉलिवूडमध्ये करीना पुन्हा आई होणार असल्याची चर्चा सुरू होती. सैफ आणि करीनाने आता नव्या पाहुण्याच्या आगमानाची चाहूल असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे.
त्यामुळे साराला इब्राहिम, तैमूरनंतर आता आणखी एक भावंड येणार आहे. सारा आपल्या दोन्ही भावांवर खूप प्रेम करते. त्यांच्यासह आपले फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे पुन्हा एकदा ताई होणार असल्याने फक्त साराच नव्हे तर सैफ आणि करिनाच्या कुटुंबासाठी हे मोठं असं गिफ्ट आहे.