मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Adipurush Controversy: रामायणातील सीतेला आवडला नाही आदिपुरुष मधील रावण; म्हणाली 'प्रेक्षकांच्या विश्वासाशी...'

Adipurush Controversy: रामायणातील सीतेला आवडला नाही आदिपुरुष मधील रावण; म्हणाली 'प्रेक्षकांच्या विश्वासाशी...'

दीपिका चिखलिया

दीपिका चिखलिया

हनुमानाच्या वेषभूषेमुळे भावना दुखावल्याचे आरोप एका खासदाराने केले होते. आता याबद्दल 'रामायण' या सुप्रसिद्ध मालिकेतील सीतेने या चित्रपटावर आपले मत व्यक्त केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 05 ऑक्टोबर : सध्या दसरा सण जोरात सुरू आहे. जागोजागी रामलीला सादर केली जात असून राम-रावणाचे युद्ध पारंपरिक पद्धतीने दाखवले जात आहे. महोत्सवाच्या निमित्ताने 'आदिपुरुष' चित्रपटाच्या निर्मात्याने टीझर रिलीज करून खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून रावण आणि हनुमानाच्या पात्रांवरून वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. या सिनेमातील रावणाच्या वेषभूषेवरून चित्रपटाला ट्रोल केलं जात आहे. काल हनुमानाच्या वेषभूषेमुळे भावना दुखावल्याचे आरोप एका खासदाराने केले होते. आता याबद्दल 'रामायण' या सुप्रसिद्ध मालिकेतील सीतेने या चित्रपटावर आपले  मत व्यक्त केले आहे.

आदिपुरुष चित्रपट रामायणांवर आधारित असल्याने त्याची तुलना आता रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेशी केली जात आहे. त्यामध्ये अरुण गोविल यांनी रामाची तर  दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली आहे. या भूमिका अजरामर झाल्या आहेत. त्यांनी लोकांच्या मनावर एक  वेगळी छाप सोडली होती. आता आदिपुरुष चा टीझर पाहून लोक या चित्रपटाला रामायण मालिकेशी जोडू पाहत आहेत. सगळीकडून या चित्रपटाला ट्रोली  होत असताना आता सीतेच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी या चित्रपटाबद्दल आपले मत मांडले आहे. त्याची आता सगळीकडे चर्चा होतेय.

हेही वाचा - Adipurush : 'आदिपुरुष'च्या अडचणी वाढल्या; जोरदार ट्रोलिंग नंतर MP च्या मंत्र्यानं केले गंभीर आरोप

अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, ''आदिपुरुष चित्रपटातील रावणाची तुलना अरविंद त्रिवेदीसोबत करणे मला तरी बरे वाटत नाही. एखादे पात्र स्वत:च्या पद्धतीने मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, असे माझे मत आहे. टीझर नुकताच आला आहे, इतक्या लवकर निर्णय घेणे खूप घाईचे असेल. कोणत्याही चित्रपटाचा आशय पाहणे आवश्यक असते, पण जेव्हा रामायण येतो तेव्हा लोकांच्या भावना पाहणेही आवश्यक असते.''

पण एवढे बुलून दीपिका पुढे म्हणाल्या की, 'लोकांचा विश्वास तिच्याशी निगडित आहे. मी सार्वजनिक ठिकाणी जीन्स घालणे जवळजवळ सोडून दिले आहे, कारण लोक अजूनही माझ्यातील सीतेची पूजा करतात. सैफ अली खानच्या पात्र रावणाची तुलना खिलजीशी केली जात आहे, रावण जर श्रीलंकेचा असेल तर तो तसाच दिसला पाहिजे. पण हा रावण  मुघल नसून मुघलसारखा दिसत आहे. माझ्या मते चित्रपटातील व्यक्तिरेखा पाहणे महत्त्वाचे आहे. टीझरमध्ये फक्त 30 सेकंद पाहिल्यावर मला फार काही समजले नाही, हो तो खूपच वेगळा लूक होता. माझा विश्वास आहे की काळाबरोबर बदल होणे आवश्यक आहे, परंतु प्रेक्षकांच्या विश्वासाशी खेळू नये

First published: