मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सई मांजरेकरची 'वास्तव' पाहून डोळ्यात येईल पाणी, सलमाननं शेअर केला VIDEO

सई मांजरेकरची 'वास्तव' पाहून डोळ्यात येईल पाणी, सलमाननं शेअर केला VIDEO

अभिनेत्री सई मांजरेकरला घेऊन वडील महेश मांजरेकर यांनी वास्तव नावाची शॉर्ट फिल्म घरीच तयार केली आहे. Covid-19 ची परिस्थिती दाखवणारी ही फिल्म सलमानने शेअर केली.

  मुंबई, 08 एप्रिल : सध्या कोरोना व्हायरसनं भारतात अक्षरशः थैमान घातलं आहे. याचा प्रभाव फक्त सामान्य लोकांवरच नाही तर सेलिब्रेटच्या लाइफवरही पडला आहे. या व्हायरसचं भयानकता लक्षात घेता सध्या सर्वच कलाकार सर्व शूटिंग थांबवून घरी बसले आहेत. पण घरी राहूनही त्यांचं काम मात्र चालूच आहे. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या घरीच कोरोना व्हायरसवर आधारित एक शॉर्टफिल्म तयार केली आहे. ज्याचा व्हिडीओ सलमाननं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खाननं शेअर केलेली या शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे. याशिवाय फिल्ममध्ये त्यांनी अभिनयही केला आहे. या फिल्मचं नाव ‘वास्तव’ असं असून फिल्मची कथा कोरोना आणि त्याबाबत दाखवलेल्या निष्काळजीपणे एका कुटुंबाला काय भोगावं लागतं याभोवती फिरते. या फिल्ममध्ये कोणताही संवाद नाही. मात्र तरीही ही फिल्म मूकपणे बरंच काही सांगून जाते. वाचा - दोन्ही लेकी कोरोना पॉझिटिव्ह, मुलींनतर बॉलिवूडचा निर्माता COVID-19 च्या विळख्यात या व्हिडीओत महेश मांजरेकर सुरुवातीला ड्रिंक आणि स्मोक करताना दाखवले आहेत. त्यांची दारु आणि सिगारेट संपल्यामुळे ते ती आणण्यासाठी बाहेर जातात. त्यांच्या मुली बाहेर न जाण्याविषयी त्यांना समजावतात. मात्र ते ऐकत नाहीत. शेवटी त्याची परिणाम जो व्हायला नको तोच होतो. या फिल्ममध्ये अभिनेत्री सई मांजरेकरचा अभिनय मनाला चटका लावून जातो.
  View this post on Instagram

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

  सध्या सर्वांनाच खूप कठीण काळातून जावं लागत आहे. या परिस्थितीचा सामना करणारे तुम्ही एकटेच नाही. त्यामुळे तुमचा निष्काळजीपणा किंवा छोटीशी चूक सुद्धा खूप मोठ नुकसान करुन जाऊ शकते हे वास्तव आहे. असा संदेश या शॉर्टफिल्ममधून देण्यात आला आहे. (संपादन : मेघा जेठे) अन्य बातम्या वर्कआउटसाठी डंबेल्सऐवजी लहान भावाचा वापर,श्वेता तिवारीच्या मुलीचा VIDEO व्हायरल लग्नानंतर दीपिकाच्या या सवयीला वैतागला आहे रणवीर, आई सुद्धा समजावून थकली
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Coronavirus, Salman Khan (TV Actor)

  पुढील बातम्या