मुंबई, 04 मार्च : ‘मिमी’ हा हिंदी सिनेमा मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. हा सिनेमा ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात अभिनेत्री कृती सेनन हिची प्रमुख भूमिका आहे. मात्र यासोबतच मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सुद्धा या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. मात्र या सिनेमाचं शूटिंग संपवून पॅक अपनंतर हॉटेलवर येताना सई ताम्हणकरच्या पायाला दुखापत झाली.
सध्या सई तिचा पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही त्या स्थितीत शूटिंग करत आहे. राजस्थानमधील मांडवा येथे लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘मिमी’ या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. यात कृती सनोनसोबत सई ताम्हणकर महत्वाच्या भूमिकेत आहे. पण पॅकअपनंतर तिच्या पायाला दुखापत झाली आणि तिच्या पायाला प्लास्टर करण्यात आलं. आणखी काही दिवस सई ताम्हणकरला तशाच अवस्थेत शूटिंग करावं लागणार आहे. सेटवर तिची योग्य ती काळजी घेतली जात आहे.
नीना गुप्ताच्या मुलीनं घेतला घटस्फोट, पती होता बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता

शूटिंगमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून सईने शूटिंग न थांबवता काम करणं पसंत केलंय. काही दिवसांपूर्वी ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या सिनेमामुळे सई ताम्हणकर चर्चेत आली होती. या सिनेमाचा टिझर रिलीज झाला होता ज्यात सईचा आवाज ऐकू येत होता. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याशिवाय काही काळापूर्वी रिलीज झालेला तिचा ‘धुरळा’ हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला.
‘मी त्याचे पाय तोडले; आता चालणंही कठीण झालं आहे’, सैफशी भांडणाबाबत अजयचा खुलासा
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारी सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या सिनेमांपेक्षाही तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. तिच्या बोल्ड फोटोशूटची चर्चाही बऱ्याचवेळा होताना दिसते. सई तिच्या अभिनयासोबतच मराठीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते.
…आणि क्षणार्धात ‘मिस्टर इंडिया’प्रमाणे सनी लिओनी सुद्धा झाली अदृश्य, पाहा VIDEO मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.