VIDEO : सई ताम्हणकरच आहे 'सविता भाभी', पाहा 'अश्लील उद्योग...'ची पहिली झलक

VIDEO : सई ताम्हणकरच आहे 'सविता भाभी', पाहा 'अश्लील उद्योग...'ची पहिली झलक

‘सविता भाभी... तू इथेच थांब!’ असे पोस्टर पुण्यामध्ये लावण्यात आले होते. तर हे पोस्टर आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे होर्डिंग लावण्यात आलं होतं.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : ‘सविता भाभी... तू इथेच थांब!’ असे पोस्टर पुण्यामध्ये लावण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस या होर्डिंगमागे काय गुपित आहे याची चर्चा रंगली होती. तर हे पोस्टर आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे होर्डिंग लावण्यात आलं होतं. या चित्रपटातील सविता भाभी कोण आहे, हे कोडं मात्र उलगडलं नव्हतं. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि काहीसा उत्सुकतावर्धक असा हा ट्रेलर आहे. या ट्रेलरच्या सुरूवातीलाच ‘सविता भाभी’चं कोडं उलगडण्यात आलं आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘सविता भाभी’ची भूमिका साकारणार आहे.

आपल्या बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध असणारी सई ताम्हणकर ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’मध्ये ‘सविता भाभी’ साकारणार आहे. मात्र तिचं हे पात्र काहीसं गुढ आहे. नुकतच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरवरून अभिनेता अभय महाजनभोवती चित्रपटाचं कथानक फिरत असल्याचं दिसून येतंय. अभय महाजन आणि सई ताम्हणकर या दोघांचीही पात्रं रहस्यमय आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच हे रहस्य नेमकं काय आहे ते उलगडेल.

अभय महाजन, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर यांची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट 6 मार्च 2020 ला प्रदर्शित होणार आहे. आलोक राजवाडेचं दिग्दर्शन असल्याने नक्कीच प्रेक्षकांनी काहीतरी ‘भन्नाट आणि Unique’ पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटात सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके आणि अमेय वाघ सुद्धा असणार आहे. या सर्वांची हटके झलक प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आहे.

First published: February 17, 2020, 4:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या