मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अभिनेत्रीच नव्हे तर राज्यस्तरीय कब्बडीपटू आहे सई ताम्हणकर;कराटेमध्येही मिळालं होतं ऑरेंज बेल्ट

अभिनेत्रीच नव्हे तर राज्यस्तरीय कब्बडीपटू आहे सई ताम्हणकर;कराटेमध्येही मिळालं होतं ऑरेंज बेल्ट

मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणू सई ताम्हणकरकडे पाहिलं जात. मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, रिएलिटी शोज आणि वेबसिरीजमध्ये झळकणारी सई आज सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे.

मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणू सई ताम्हणकरकडे पाहिलं जात. मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, रिएलिटी शोज आणि वेबसिरीजमध्ये झळकणारी सई आज सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे.

मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणू सई ताम्हणकरकडे पाहिलं जात. मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, रिएलिटी शोज आणि वेबसिरीजमध्ये झळकणारी सई आज सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 12ऑक्टोबर- मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Actress) एक स्टायलिश आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरची (Sai Tamhankar) ओळख आहे. आपल्या अभिनयाने सईने सर्वांनाच आपलं वेड लावलं आहे. उत्कृष्ट अभिनयासोबतच ग्लॅमरस अंदाज ही सईची जमेची बाजू आहे. मात्र ही अभिनेत्री खेळातही तितकीच तरबेज आहे हे फारच कमी लोकांना माहिती आहे. सई ही राज्यस्तरीय कब्बडीपटू आहे.

मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणू सई ताम्हणकरकडे पाहिलं जात. मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, रिएलिटी शोज आणि वेबसिरीजमध्ये झळकणारी सई आज सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. सई ही मूळची सांगलीची आहे. सांगलीमध्ये जन्मलेल्या सईला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. तिने अनेक महाविद्यालयीन नाटकांमध्ये सहभाग घेतला आहे हे सर्वांनांच माहिती आहे. मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे सई ताम्हणकर ही एक उत्तम खेळाडूसुद्धा आहे. शैक्षिणकी आयुष्यात ती एक उत्तम कब्बडीपटू होती. फक्त कब्बडीपटू नव्हे तर ती राज्यस्तरीय कब्बडीपटू होती. वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे. सईने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलं होतं. तिने राज्यस्तरीय स्पर्धेमध्येसुद्धा चांगली कामगिरी केली आहे.

(हे वाचा:' फॉर द लव्ह...' म्हणत सई ताम्हणकरनं शेअर केला सुपरक्लासी VIDEO ... )

इतकंच नव्हे तर सईला कराटेसुद्धा अवगत आहे. तिला अतिशय उत्कृष्ट असं कराटेच ज्ञान आहे. त खूप छान कराटे खेळते. महत्वाचं म्हणजे आपल्या अभिनयाची जादू रसिक प्रेक्षकांवर पसरवणारी सई कराटेमध्ये ऑरेंज बेल्ट आहे. या अभिनेत्रीने कराटेमध्ये आपलं नैपुण्य दाखवत या खेळातील ऑरेंज बेल्ट पटकावला आहे. त्यामुळे फक्त अभिनय, डान्स किंवा फॅशनच नव्हे तर सई ताम्हणकर खेळातसुद्धा उत्तम आहे. सई ताम्हणकरच्या या कौशल्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्रींचे हे गुण ऐकून नक्कीच आनंद झाल्याशिवाय राहणार नाही.

(हे वाचा:'My Iron Lady' प्रिया बापटसाठी सई ताम्हणकरच्या 'वजनदार' शुभेच्छा ... )

सई ताम्हणकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ही अभिनेत्री नुकताच 'मिमी' या हिंदी चित्रपटात झळकली होती. यामध्ये ती अभिनेत्री क्रिती सेननच्या मैत्रिणीच्या महत्वाच्या भुमीकेत दिसली होती. तिच्या भूमिकेची मोठी चर्चा झाली होती. तसेच सई ताम्हणकर अलिकेच 'समांतर २' या मराठी वेबसिरीजमध्ये झळकली होती. यामध्ये तिचा अभिनय प्रेक्षकांना फार पसंत पडला होता. तिच्या भूमिकेची सोशल मीडियावर मोठी चर्च झाली होती. सोबतच तिच्या बोल्ड अँड हॉट अंदाजाचीदेखील चर्चा झाली होती. यामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी आणि तेस्वविनी पंडितसुद्धा होते. सध्या सई ताम्हणकर टीव्ही शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहे.

First published:

Tags: Marathi entertainment, Sai tamhankar