मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बिकिनी घातल्यानंतर मराठी इंडस्ट्रीकडून मिळाली अशी वागणूक...सई ताम्हणकरनं सांगितला अनुभव

बिकिनी घातल्यानंतर मराठी इंडस्ट्रीकडून मिळाली अशी वागणूक...सई ताम्हणकरनं सांगितला अनुभव

ऑन-स्क्रीन बिकिनी घालण्याच सई ताम्हणकरला आलेला अनुभव तिनं नुकत्याच pinkvilla ला दिलेल्या मुलाखतीत सांगतिला आहे. यावर मराठी इंडस्ट्रीतील लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या याबद्दल ती सांगताना दिसली.

  मुंबई, 16 मार्च- सई ताम्हणकरला ( Sai Tamhankar ) मराठीतील बिकिनी गर्ल म्हणून सगळे ओळखतात. नो एंट्री पुढे धोका आहे सिनेमात सईनी बिकिनी शॉट देऊन मराठी इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली होती. आता मराठी अभिनेत्री बिकिनी शूट करताना दिसतात मात्र त्यावेळी सईच्या बिकिनी शॉटची चांगलीच चर्चा झाली होती. ऑन-स्क्रीन बिकिनी घालण्याच सईला आलेला अनुभव तिनं नुकत्याच pinkvilla ला दिलेल्या मुलाखतीत सांगतिला आहे. सई ताम्हणकर तिच्या बिकिनी शॉटविषयी म्हणाली की, 'जेव्हा मी बिकिनी घातली, तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे मराठी मनोरंजन विश्वाने मोकळ्य मनाने माझं स्वागत केले. पण असं जरी असलं तरी थोड्याप्रमाणात माझ्यावर टीकाही झाली. वाचा-उत्कृष्ट अभिनेत्री झाली शेफ..तयार केलेला पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी तसेच ती पुढे म्हणते की, मला वेगवेगळ्या टाईपच्या भूमिका साकारण्यास आवडतात. हंटर नंतर मला त्या पद्धतीच्या भूमिका येत असल्याचे तिनं सांगितलं. पण तीन वर्षानंतर लव्ह सोनिया सिनेमा मिळाला. यातील भूमिका वेगळी होती म्हणून मी तो सिनेमा स्वीकारला असल्याचे तिनं पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत यावेळी सांगतिलं.
  सई पुढे म्हणाली की, मी आमिर खानची ( aamir khan ) खूप मोठी फॅन होती. मी आईला लहानपणीच सांगितले होते की, मी जेव्हा मोठी होईल तेव्हा याच्याशी लग्न करेल. तिनं गजनी सिनेमात आमिर खानसोबत काम केले आहे. या सिनेमात काम करण्यासंदर्भात तिला जेव्हा फोन आला तेव्हा लगेच होकार कळवल्याचे देखील तिनं सांगितलं. तसेत मला हिंदीतील कोंकणा सेन, आलिया भट्ट, सीमा पावा, तिलोतमा, राधिका आपटे या बॉलिवूड कलाकरांसोबत काम करायला आवडेल असं देखील सांगितले.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Sai tamhankar

  पुढील बातम्या