S M L

'लव्ह सोनिया'च्या स्क्रीनिंगसाठी सई ताम्हणकर लंडनला रवाना

लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'लव्ह सोनिया' या सिनेमाने उद्घाटन होणार आहे. लाइफ ऑफ पाय आणि स्लमडॉग मिलीनियर ह्या सिनेमाचे निर्माते तबरेज नुरानी ह्यांनी लव सोनिया ह्या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 20, 2018 02:07 PM IST

'लव्ह सोनिया'च्या स्क्रीनिंगसाठी सई ताम्हणकर लंडनला रवाना

मुंबई, 20 जून : 'लव्ह सोनिया' ह्या सिनेमासाठी अभिनेत्री सई ताम्हणकर लंडनला रवाना झालीय. लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'लव्ह सोनिया' या सिनेमाने उद्घाटन होणार आहे. लाइफ ऑफ पाय आणि स्लमडॉग मिलीनियर ह्या सिनेमाचे निर्माते तबरेज नुरानी ह्यांनी लव सोनिया ह्या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे.

लव्ह सोनिया सिनेमामध्ये राजकुमार राव, रिचा चढ्ढा, सई ताम्हणकर, मनोज वाजपेयी, अनुपम खेर हे बॉलीवूडचे सितारे आणि डेमी मोर आणि फ्रिडा पिंटो ह्या हॉलीवूड अभिनेत्री दिसणार आहेत.

लव्ह सोनिया हा दोन बहिणींचा सिनेमा आहे. सेक्स ट्रॅफिकिंगमध्ये अडकलेल्या सोडणाऱ्या बहिणीची गोष्ट आहे.

लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलची ओपनिंग फिल्म असलेल्या लव्ह सोनियाबद्दल सई सांगते, 'एका सशक्त मुलीची ही कथा आहे. बागरी लंडन फिल्म फेस्टिवल या एका महत्त्वपूर्ण फिल्म फेस्टिवलचे ओपनिंग या फिल्मने होते आहे. या फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातले सिनेरसिक येतात. त्यामुळे ही नक्कीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.'

Loading...
Loading...

सई ताम्हणकरच्या लव्ह सोनिया सिनेमाचे शूटिंग मुंबई, जयपूर, हाँगकाँग आणि लॉस एंजलिसमध्ये झाले आहे. लवकरच सप्टेंबरमध्ये हा सिनेमा रिलीज होईल.

हेही वाचा

डीएसके प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे 5 अधिकारी अाणि डीएसकेंचा 1 अभियंता यांना अटक

तामिळनाडूच्या अनुकृती वासनं पटकावला फेमिना मिस इंडियाचा किताब

आज जागतिक निर्वासित दिन, प्रश्न अजूनही कायम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2018 02:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close