मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सई आणि ललित यांचे 'कार'नामे, पाहा बंद गाडीमध्ये काय करतात सेलेब्स?

सई आणि ललित यांचे 'कार'नामे, पाहा बंद गाडीमध्ये काय करतात सेलेब्स?

कलाकारांना सगळे कायम मोठमोठ्या गाड्यांमध्ये बसताना आणि फिरताना पाहतात. त्यांचं कारशी असलेलं एक वेगळं नातं आहे. कलाकार गाड्यांमध्ये बसून नेमकं काय करतात असा प्रश्न अनेकांना असतो. सई आणि ललित या जोडीने (Sai Tamhankar-Lalit Prabhakar) याच गोष्टीवर काही चक्रावून टाकणारे खुलासे केले आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 13 जून: मराठीतील आघाडीचे दोन कलाकार (Sai Tamhankar ) सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) सध्या अनेक प्रोजेक्ट्स मध्ये एकत्र दिसत आहेत. सई आणि ललित यांच्या जोडीचं बराच कौतुक होत आहे. ही जोडी पुन्हा एकदा ‘मिडीयम स्पायसी’ (Medium Spicy) चित्रपटातून एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने केलेला त्यांचा एक बीटीएस विडिओ प्रचंड viral होत आहे. काय आहे या व्हिडिओमध्ये नेमकं? सई आणि ललित यांचा कारमधील एक विडिओ सध्या बराच चर्चेत येत आहे. मिडीयम स्पायसी चित्रपटात काही सीन्स हे कारमध्ये शूट केले असल्याने या चित्रपटात कारचं बरच महत्त्व आहे. तसंच कारचं महत्त्व कलाकारांच्या आयुष्यात सुद्धा आहे. कोणतेही कलाकार गाडीत जितका वेळ घालवतात त्याहून कमीच कदाचित इतर कुठे घालवत असतील. अशा वेळी कारमध्ये कलाकार काय काय करतात असा प्रश्नसुद्धा अनेकांना पडतो. याच सगळ्या प्रश्नांना सई आणि लिलिटने उत्तरं द्यायचा प्रयत्न केला आहे. अनेकदा कलाकारांचे फोटो फक्त कारमध्ये बसतानाचे असतात. गाडीमध्ये येण्याजाण्यात कलाकारांचा अधिक वेळ जातो. अशा वेळी गाडी हे आमचं दुसरं घर अस्त असं सई सांगते. “मी स्वतः गाडीत कपडे बदलेले आहेत,. खूप वेळा एका जागेवरून दुसऱ्या जागी जाताना वेळ मिळत नाही त्यामुळे मी गाडीतच कोणालाही न दिसता कपडे चेंज केले आहेत. गाडीमध्ये मी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. पार्टी केली आहे, अनेकदा जेवले आहे खाल्लं आहे. मुख्य म्हणजे मी एकदा हात आणि पायाचं waxing सुद्धा गाडीत जाता जाता केलं आहे”,  असं सई सांगते. ललितने तर एक भन्नाट खुलासा सुद्धा केला आहे. ललित निसर्गाच्या हाकेला ओ द्यायचं काम सुद्धा गाडीत करतो असं त्याने गमतीत हसतहसत सांगितलं आहे. “गाडीत मी अनेकदा झोप पूर्ण केली आहे. कलाकारांचं अर्ध आयुष्य गाडीतच जातं असं मला वाटत त्यामुळे मी अनेकदा गाडीत फक्त झोपलो आहे.” असं सुद्धा तो सांगतो. सई आणि ललित ही जोडी आता प्रेक्षकांच्या आवडीची जोडी झाली आहे. त्यांनी याआधी पेटपुराण वेबसिरीज एकत्र केली असून आता मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘मिडीयम स्पायसी’ चित्रपटात ते एकत्र दिसणार आहेत. हे ही वाचा'वाईट काळ नवरा बायकोसाठी परीक्षेची वेळ', नवऱ्यासाठी अभिज्ञा कशी राहिली खंबीरपणे उभी?
 यांचा हा पहिला प्रोजेक्ट आहे ज्यात त्यांनी एकत्र काम केलं आहे. त्यांचे इतर प्रोजेक्ट जरी रिलीज झाले असले तरी त्यांनी सोबत केलेलं हे पहिलं काम होतं जे आत्ता लोकांसमोर येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्या दिवसापासून त्यांनी एकत्र बरीच मेहनत केली. शेफच प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये एकत्र काम सुद्धा केलं.
First published:

Tags: Marathi actress, Sai tamhankar

पुढील बातम्या