मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sai Tamhankar in IIFA: उफ्फ! IIFA च्या सोहळ्यासाठी सईचा मोहात पाडणारा चमचमता mermaid लुक

Sai Tamhankar in IIFA: उफ्फ! IIFA च्या सोहळ्यासाठी सईचा मोहात पाडणारा चमचमता mermaid लुक

मराठीसोबत आता बॉलिवूड मध्ये जिचा डंका वाजतो आहे अशी अभिनेत्री म्हणजे (Sai Tamhankar) सई ताम्हणकर. सई सध्या IIFA अवॉर्डस साठी दुबईला गेली आहे आणि तिथे सुद्धा  ती भयंकर चर्चेत आली आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 4 जून: मराठी चित्रपटसृष्टीची परम सुंदरी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) असंख्य कारणांनी सतत चर्चेत असते. अगदी युट्युब पासून. हिट चित्रपटांपर्यंत सगळीकडे आपला दबदबा असलेली सई थेट जाऊन पोहोचली आहे दुबईला ते ही IIFA पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी. सई इथे एक खास कारणासाठी गेली आहे आणि ते म्हणजे तिला असलेलं नामांकन. (Sai Tamhankar in IIFA) सईला यावर्षीच्या IIFA सोहळ्यात सहाय्य्क अभिनयासाठी स्त्री विभागात नामांकन आहे. सईने तिचे सोहळ्यातले खास फोटो शेअर केल्यावर तिच्या लुकमुळे चाहते नक्कीच घायाळ झाले असणार याची खात्री आहे. सईने तिच्या जुन्या मैत्रिणीकडून खास लुक डिजाईन करून घेतला आहे. साईशा शिंदे या फॅशन डिझायनरने डिझाईन केलेला सुंदर असा घेर असलेला ड्रेस तिने या सोहळ्यात परिधान केला आहे. तिचा हा लुक धुमाकूळ घालत आहे. ब्लॅक ब्लाऊज, व्हाईट झगमगता घेर असलेला मोठा स्कर्ट आणि वेस्टर्न ज्वेलरी आणि ऍक्सेसरीज सोबत तिने एक अप्रतिम लुक परिधान केला आहे. यात तिला पाहून थेट mermaid ची आठवण येत आहे. सईने खास समुद्राचं बॅकग्राउंड असलेले फोटो आणि धमाकेदार रील शेअर केलं आहे.
सईने बॉलिवूडमध्ये आपली छाप सोडली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'मिमी' (Mimi) या चित्रपटात तिने साकारलेली शमा प्रचंड प्रसिद्ध झाली.  सईने यात क्रिती सॅनन सोबत तोडीस तोड काम केलं आहे. सई मराठी इंडस्ट्रीचं नाव बॉलिवूडमध्ये घेऊन गेल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. सईचा आतापर्यंतचा प्रवास एकदम झकास राहिला आहे.
तिच्या बॉलिवूड जर्नीची सुरवात सुद्धा दणक्यात झाली आहे. तिला या चित्रपटातील भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला का हे मात्र अजून समोर आलं नाहीये. सई नुकतीच 'पेट पुराण' वेबसिरीजमध्ये झळकली होती. याशिवाय तिची B E रोजगार नावाची युट्युब सिरीज सुद्धा भाडीपा चॅनेलवर चालू आहे. सई येत्या काळात कोणता नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार हे बघण्यासारखं असेल
First published:

Tags: Bollywood, Marathi actress, Sai tamhankar

पुढील बातम्या