मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sai Tamhankar in IIFA: परम सुंदरीनं दिमाखात पटकवलं अवॉर्ड, IIFAमध्ये वाजला मराठीचा डंका

Sai Tamhankar in IIFA: परम सुंदरीनं दिमाखात पटकवलं अवॉर्ड, IIFAमध्ये वाजला मराठीचा डंका

सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही आता मराठीसोबत आता बॉलिवूडमध्ये सुद्धा आपली तुफान कामगिरी करत आहे. सई सध्या IIFA अवॉर्डस साठी दुबईला गेली आहे आणि तिथे जाऊन तिने समस्त मराठी प्रेक्षकांना खुश करणारी मोठी कामगिरी केली आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 5 जून: मराठीमधली बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) बद्दल कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सई ज्या पद्धतीने यशाचं शिखर गाठत पुढे जात आहे ते बघून सगळ्यांनाच आनंद होत आहे. सई आता फक्त मराठीमध्ये मर्यादित न राहता हिंदी चित्रपटाततून सुद्धा (Sai Tamhankar in Bollywood) प्रेक्षकांसमोर आली. सध्या सईच्या आनंदाला सीमा उरली नाहीये. असं काय झालं आहे नक्की तिच्या आयुष्यात? सई सध्या दुबईला एका खास कारणासाठी गेली आहे आणि ते कारण म्हणजे IIFA पुरस्कार सोहळा. यावर्षी सईला सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्रींच्या विभागात नामांकन होतं. सईने दिमाखात या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावत चारचाँद लावले होते.  सईचा आनंद आता द्विगुणित झाला असणार हे मात्र खरं, कारण ज्या विभागात तिला नामांकन मिळालं होतं त्यासाठी तिला अवॉर्ड सुद्धा मिळालं आहे. (Best Supporting Actress) सईला IIFA अवॉर्डस २०२२ मध्ये सर्वोकृष्ट सहाय्य्क अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ‘मिमी’ (Mimi Film) या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. तिने या चित्रपटात साकारलेली भूमिका शमा सगळ्यांनाच फार आवडली होती. या चित्रपटाच्या निमित्तानं तिला क्रिती सॅनॉन, पंकज त्रिपाठी अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली. 
सईने थेट दुबईच्या धरतीवर जाऊन मराठीचं नाव राखलं आणि नुसतं राखलं नाही तर अभिमानाने उंच सुद्धा केलं अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. एवढ्या मोठमोठ्या बॉलिवूड स्टारसोबत सईचं नाव नामांकनात आहे यावरच तिचं कौतुक केलं जात होतं आता पुरस्कार मिळाल्यानंतर तर तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील तिच्या अनेक मित्रमैत्रिणींनीसुद्धा तिचं कौतुक केलं आहे आणि तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दुबईला असताना तिने खूप धमाल आणि मजा केल्याचं दिसून आलं. तिने ‘सई इन IIFA’ अशा नावाने तिने खास व्हिडिओसुद्धा शेअर केले होते. यात काही मजेदार रॅपिड फायर प्रश्न, तिचा मेकअप लुक, आऊटफिट अशा अनेक गोष्टींबद्दल तिने खास अपडेट्स सुद्धा शेअर केले होते.
सईने या सोहळ्यासाठी खास लुक डिजाईन करून घेतला होता ज्यात खूप अप्रतिम ती खूप अप्रतिम दिसत होती. चक्क mermaid सारखा दिसणारा लुक सईने परिधान केल्याने चाहत्यांना आनंद झाला. हे ही वाचाSai Tamhankar in IIFA: उफ्फ! IIFA च्या सोहळ्यासाठी सईचा मोहात पाडणारा चमचमता mermaid लुक सई कायमच तिच्या अभिनयातून विविधता दाखवत आली आहे. कधी बोल्ड भूमिका तर कधी प्रवाहाच्या विरुद्ध जात तिने केलेल्या काही कणखर भूमिकासुद्धा खूप गाजल्या आहेत. 
First published:

Tags: Bollywood, Marathi actress, Sai tamhankar

पुढील बातम्या