SPECIAL REPORT : #पुन्हा निवडणूक हॅशटॅग मागे हे होतं कारण, सईनेही केला खुलासा!

SPECIAL REPORT : #पुन्हा निवडणूक हॅशटॅग मागे हे होतं कारण, सईनेही केला खुलासा!

राज्यात एकीकडे सत्तास्थापनेचं महाभारत सुरू असताना अचानक काही मराठी सिने कलाकारांनी पुन्हा निवडणूक हा हॅशटॅग सोशल मीडियावर सुरू केला आणि...

  • Share this:

नीलिमा कुलकर्णी,प्रतिनिधी

मुंबई, 16 नोव्हेंबर : राज्यात एकीकडे सत्तास्थापनेचं महाभारत सुरू असताना अचानक काही मराठी सिने कलाकारांनी पुन्हा निवडणूक हा हॅशटॅग सोशल मीडियावर सुरू केला आणि जनसामान्यांसोबत राजकीय वर्तुळातही यावरुन चर्चा सुरू झाली.

पुन्हा निवडणूक....मराठी कलाकार अचानकपणे #पुन्हा निवडणूक? असा हॅशटॅग Tweet करू लागले आणि एक नवाच वाद सोशल मीडियावर निर्माण झाला. काहींनी कलाकारांच्या बाजूने आणि काहींनी विरोधात Twitter वर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.

Loading...

सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर या आघाडीच्या मराठी कलाकारांनी आपापल्या ट्विटर हँडलवर फक्त एवढा एकच हॅशटॅग लिहिला होता.

सध्याच्या राजकीय घडामोडींवर मराठी कलाकारांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे, असं समजून अनेक जणांनी या कलाकारांना पाठिंबा दिला, तर अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं. मराठी कलाकारांना घेऊन भाजपने रचलेला हा डाव असल्याचे आरोप सुरू झाले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही मराठी कलाकारांचा भाजपने वापर करू नये, असं मत व्यक्त केलं.

पण अखेर खरी गोष्ट समोर आली. हा कोणताच राजकीय डाव नसून किंवा कोणत्याही पक्षाला दिलेला पाठिंबा नसून 'धुराळा' या आगामी सिनेमाचं प्रमोशन असल्याचं सूचक ट्विट सिद्धार्थ जाधवने केलं.

प्रसिद्धीसाठी कलाकार आता राजकीय घडामोडींचा आधार घेऊ लागले. त्यामुळे या पुढे नेतेच काय तर कलाकारही कोणत्या थराला जाऊ शकतात याचा नेम नाही.

============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2019 07:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...