मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sai Tamhankar news: मराठीची परमसुंदरी घाबरली होती एकाच गोष्टीला, शेअर केला हादरवून टाकणारा किस्सा

Sai Tamhankar news: मराठीची परमसुंदरी घाबरली होती एकाच गोष्टीला, शेअर केला हादरवून टाकणारा किस्सा

मिडीयम स्पायसी चित्रपटातून समोर येणारी बोल्ड बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) खऱ्या आयुष्यात एकदाच प्रचंड घाबरली होती. काय होता तो प्रसंग?

मिडीयम स्पायसी चित्रपटातून समोर येणारी बोल्ड बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) खऱ्या आयुष्यात एकदाच प्रचंड घाबरली होती. काय होता तो प्रसंग?

मिडीयम स्पायसी चित्रपटातून समोर येणारी बोल्ड बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) खऱ्या आयुष्यात एकदाच प्रचंड घाबरली होती. काय होता तो प्रसंग?

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 10 जून: आपल्या जबरदस्त अदांनी सगळ्या प्रेक्षकांना फिदा करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या भलतीच चर्चेत असते. तिचं करिअर सुसाट वेगात धावत असल्याने सई अनेक प्रमोशन्स आणि मुलाखतींमध्ये व्यस्त आहे. मराठीतली बिनधास्त मुलगी म्हणून ओळख असलेली सई कशाला घाबरत असेल याच्याशी निगडित एक किस्सा तिने शेअर केला आहे.  सई  तसं बघायला गेलं तर प्रचंड बिनधास्त आणि रोखठोक आहे. तिला खोटं वागता येत नाही असं ती वारंवार मुलाखतीत सुद्धा स्पष्ट करते. सई कोणत्याच गोष्टीला  करून घाबरत नाही असं सुद्धा ती सांगते. पण असा एक भयानक किस्सा आहे ज्याची आठवण झाली तरी सईला भीती वाटते.  एवढ्या व्यस्त दिवसांमधून सुद्धा वेळ काढत सई आणि पर्ण यांनी भाटुपा च्या 'कॅम्पिंग विथ स्टार्स' या कार्यक्रमात हजेरी लावली. निसर्गाच्या संदिह्यात काम्पमिंग करायला जाणं आणि कलाकारांशी त्याच त्या सोडून वेगळ्या विषयांवर गप्पा मरण या गोष्टींसाठी हा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमात सईने हा भीतीदायक किस्सा शेअर केला होता.  ती असं म्हटली होती,”ही साधारण नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी एअरपोर्टवरून एकदा घरी येत असताना माझा अपघात होता होता मी थोडक्यात बचावले होते. मी गाडीतून जात असताना ड्रायवर एवढी वेगात गाडी चालवत होता की मला त्याला अनेकदा स्पीड कमी कर असं सांगावं लागलं. पण त्याने तीनदा सांगूनही माझं ऐकलं नाही. शेवटच्या वेळी मी जेव्हा सांगितलं तेव्हा माझी गाडी अख्खी गोल फिरून ब्रिजला आपटणार होती आणि माझ्या आणि ब्रिजमध्ये साधारण वीतभर सुद्धा अंतर नव्हतं. त्यावेळी एकदाच मला खूप भीती वाटली होती. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या आठवणी एका झटक्यात नजरेसमोरून गेल्या.” सई मराठी काय बॉलिवूडमध्ये सुद्धा आपला झेंडा रोवून आली आहे. सई सध्या मिडीयम स्पायसी चित्रपटाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. सईची प्रतिमा कायमच एक बोल्ड आणि बेधडक अभिनेत्री अशी आहे. सई खऱ्या आयुष्यात सुद्धा बिनधास्त आहे. हे ही वाचा- Medium Spicy: सई-ललितनं शेफच्या भूमिकेसाठी हॉटेलमध्ये घालवला होता एक महिना पण प्रेक्षकांना कायमच हा प्रश्न पडत आला आहे की एवढ्या बिनधास्त मुलीला नक्की कशाची भीती वाटत असेल. या आठवणींच्या निमित्ताने सगळ्यांना तिच्या या पैलूची जाणीव झाली.
First published:

Tags: Bollywood actress, Marathi actress, Marathi entertainment, Sai tamhankar

पुढील बातम्या