Sai Tamhankar Bday: सांगलीची पोर ते आत्ता आयफा क्वीन हिरोईन, सध्या कमावते इतके पैसे
Sai Tamhankar Bday: सांगलीची पोर ते आत्ता आयफा क्वीन हिरोईन, सध्या कमावते इतके पैसे
शिरीन घाटगे, (बुरगुंडा) हर्षदा उभे अशा एकाहून एक सरस भूमिका लिलीया पेलणारी होतं बोल्ड पण तितकीच गोड आणि खरी सई ताम्हणकर आज तिचा छत्तीसावा वाढदिवस साजरा करत आहे.
मुंबई 24 जून: बॉलिवूडमध्ये असलेल्या परमसुंदरीला सुद्धा फिकं पाडेल अशा मराठीमधल्या परामसुंदरीचा अर्थात सई ताम्हणकरचा (Sai Tamhankar Birthday) आज वाढदिवस आहे. सईने (Sai Tamhankar ) तिच्या कारकिर्दीत अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. सांगलीच्या या बिनधास्त मुलीचा आत्तापर्यंतचा प्रवास अनेक वळणांनी भरलेला आहे.
सईची ओळख ही कायमच एक बोल्ड, डॅशिंग, मॉडर्न अभिनेत्री अशी आहे. सांगली हे तिचं मूळ गाव आहे जिथे तिचा जन्म, शिक्षण सगळं पार पडलं. सई नाटक, एकांकिकांमधून पुढे येत मालिकांमध्ये शिरली आणि मालिकेतून हळूहळू मराठी चित्रपटसृष्टीत तिचा प्रवास सुरु झाला आणि आता हा प्रवास थेट बॉलिवूडपर्यंत पोहोचला आहे. सई कायमच काळाच्या पुढे विचार करत आली आणि ती कायम आपल्या निर्णयांवर ठाम असण्यासाठी ओळखली जाते.
सईला नुकताच IIFA पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मिमी (Mimi) या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनायचा पुरस्कार मिळाला. सांगलीतून आलेली ही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सध्या यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. अनेक खाचखळग्यातून मार्ग काढत ही अवघड पण इन्ट्रेटेस्टिंग वाट तिने शोधून काढली आहे. सध्या ती आघाडीची अभिनेत्री चिक्कार पैसे कमावत आहे. सईची नेटवर्थ सध्या एक-दोन कोटीच्या घरात आहे अशीं माहिती समोर येते. काहीं माध्यमांच्या मते सई प्रत्येक फिल्मचे जवळपास 20-25 लाख रुपये घेते. या आकड्यांबद्दल बरीचशी वेगवेगळी मतं आहेत.
या अभिनेत्रीची चर्चा कधी थांबली असं कमीच पाहायला मिळालं. एकीकडे दुनियादारी, नो एंट्री, धुराळा, वाय झेड, हंटर अशा चित्रपटातून ती कधी बोल्ड तर कधी सोज्वळ भूमिकेत दिसली. हंटर, नो एंट्री अशा चित्रपटात कधीही न दिसलेला सईचा बोल्ड अंदाज दिसला. सई मराठी चित्रपटसृष्टीतील बिकिनी घालणारी बहुधा पहिलीच अभिनेत्री ठरली. तिच्या निवडीच्या बाबत ती कायम काळाचा पुढचा विचार करताना दिसली. स्वतःची बोल्ड प्रतिमा मोडून काढायला तिने गंभीर भूमिका सुद्धा स्वीकारल्या. आता सई वेबसिरीज माध्यमात सुद्धा आपली जादू पसरवत आहे. सईचं डेटिंग लाईफसुद्धा अनेकदा चर्चेचा विषय ठरलं.
सई सध्या अनिश जोगला डेट करत असून त्याबद्दल तिने अधिकृत घोषणा सुद्धा केली.
हे ही वाचा- Priya Bapat: प्रिया बापटला आली तिच्या या भूमिकेची आठवण, पोस्ट शेअर करत म्हणाली...
आत्ता येत्या काळात सई मराठीसोबत अनेक हिंदी प्रोजेक्ट्सचा सुद्धा भाग असणार आहे. आपल्या ठाम विचारसरणीमुळे आणि अप्रतिम अभिनयकौशल्यामुळे सई कायमच चाहत्यांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये टॉप नंबरवर राहिली आहे. तिच्या वाढदिवशी चाहते तिच्या उत्तुंग आयुष्याची प्रार्थना करताना दिसत आहेत.
Published by:Rasika Nanal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.