सई ताम्हणकर-शरद केळकर 'राक्षस'मध्ये एकत्र

सई ताम्हणकर-शरद केळकर 'राक्षस'मध्ये एकत्र

सई ताम्हणकर आणि शरद केळकर अशी नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे 'राक्षस' या सिनेमात. राक्षसाचं एकच भयावय रूप आजपर्यंत आपण गोष्टींमध्ये ऐकलं आहे. नुकतंच ह्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

  • Share this:

 14 डिसेंबर : सई ताम्हणकर आणि  शरद केळकर अशी नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे 'राक्षस' या सिनेमात.   राक्षसाचं एकच भयावय रूप आजपर्यंत आपण गोष्टींमध्ये ऐकलं आहे. नुकतंच ह्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

आदिवासी पाड्यांवर लहानपण गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी 'राक्षस'चं लेखन  केलंय. त्यांनी त्यांचे लहानपणचे अनुभव चित्रपटाच्या कथेत  गुंफले आहेत. समित कक्कड यांनी आतापर्यंत एकाहून एक अशा सरस चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं आहे. निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून समित कक्कड यांचा 'आयना का बायना' हा पहिला चित्रपट असून तो सोनी मॅक्ससाठी हिंदीत डब होणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. शिवाय 'हाफ तिकीट' हा समित कक्कड यांचा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट असून १५ निरनिराळ्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स' मध्ये या चित्रपटाची निवड झाली होती आणि आता 'राक्षस' चे ते प्रस्तुतकर्ते आहेत.

निर्माता - दिग्दर्शक समित कक्कड म्हणाले, 'मागील काही दिवसांपासून विवेक कजारीया आणि मी एका चांगल्या प्रोजेक्टसाठी एकत्र येण्याचा विचार करत होतो. ‘राक्षस‘ हा चित्रपट आम्हाला एका नव्या पर्वाच्या आरंभासाठी अतिशय योग्य वाटला. या ‘राक्षस’वर प्रेक्षकही भरभरून प्रेम करतील अशी अपेक्षा आहे.'

पुढच्या वर्षी  २३ फेब्रुवारीला 'राक्षस' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2017 04:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading