• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • 'दोन अभिनेत्री कधी मैत्रिणी होऊ शकत नाहीत' पण सई - प्रियाचा हा फोटो पाहून सगळं विसराल!

'दोन अभिनेत्री कधी मैत्रिणी होऊ शकत नाहीत' पण सई - प्रियाचा हा फोटो पाहून सगळं विसराल!

सईने तिची जवळची मैत्रीण प्रिया बापट( sai tamhankar and priya bapat friendsip ) हिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. चाहत्यांना हा फोटो खूपच आवडलेला आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 नोव्हेंबर: मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर  ( sai tamhankar ) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. तिचे विविध फोटो व्हिडीओ याच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत नेहमी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. नुकताच सईने तिची जवळची मैत्रीण प्रिया बापट( sai tamhankar and priya bapat friendsip ) हिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. चाहत्यांना हा फोटो खूपच आवडलेला आहे. त्यांच्याकडून कमेंटचा वर्षाव सुरूच आहे. बॉलिवूडमध्ये  (bollywood actress) एककीडे अभिनेत्रींमध्ये कॅट पाहायला मिळते. मात्र मराठी मनोरंजन विश्वात कॅट फाईट नाही तर मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये ( marathi actress ) मैत्री पाहायला मिळते. अशा अनेक मराठमोळ्या अभिनेत्री आहेत ज्यांच्यात घट्ट मैत्री आहे. यापैकी एक नाव म्हणजे मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट याचं आहे. सई ताम्हणकर आणि प्रिया बापट वजनदार या सिनेमात एकत्र दिसल्या होत्या. वाचा : VIDEO: 'देवमाणूस 2' च्या प्रमोशनासाठी चक्क रणवीर सिंह उतरला मैदानात तेही सूर्यवंशी स्टाईल... सईने नुकातच प्रियासोबतचा एका फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देत तिनं म्हटलं आहे की, जेव्हा दोन प्रिटी मुली मैत्रिणी असतात..असं म्हणत तिनं love u..असं म्हणत प्रियावरील प्रेम व्यक्त केलं आहे. चाहत्यांनी या दोघींच्या मैत्रिचे कौतुक केले आहे.
  मराठी मनोरंजन विश्वात अमृता खानविलकर आणि सोनाली खरे, तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, श्रेया बुगडे, मानसी नाईक आणि दीपाली सय्यद, सई लोकुर आणि मेघना एंरडे  या अभिनेत्रींमध्ये घट्ट मैत्री आहे. अनेकदा त्या एकत्र दिसतात. यापैकी काहींनी एकत्र व्यवसाय देखील सुरू केला आहे. अनेकादा या अभिनेत्री सोशल मीडियावर एकमेकींचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात.
  Published by:News18 Trending Desk
  First published: