...म्हणून 2 कोटींची जाहिरात नाकारली, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

...म्हणून 2 कोटींची जाहिरात नाकारली, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

काही दिवसांपूर्वी फेअरनेस क्रीमची 2 कोटी रुपयांची जाहिरात नाकारल्यानं तेलुगू अभिनेत्री साई पल्लवी खूप चर्चेत आली होती.

  • Share this:

मुंबई, 29 मे : काही दिवसांपूर्वी फेअरनेस क्रीमची 2 कोटी रुपयांची जाहीरात नाकारल्यानं तेलुगू अभिनेत्री साई पल्लवी खूप चर्चेत आली होती. तिच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुकही झालं होतं. त्यानंतर पल्लवीनं ही जाहिरात नकारण्यामागचा तिचा नेमका काय हेतू होता याचा खुलासा केला आहे.

नुकत्याच एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत पल्लवीला तिनं 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहिरात का नाकारली या मागचं कारण स्पष्ट केलं. पल्लवी म्हणाली, 'मी ही जाहिरात करू शकत नाही कारण मी एक भारतीय आहे आणि त्या दृष्टीनं माझा रंग योग्य आहे. मला वाटतं अशाप्रकारच्या अनेक जाहिराती लोकांना आणि खास करून महिलांना चुकीचा संदश देतात. त्यामुळे मला या जाहिरातीचा भाग व्हायचं नाही.'

 

View this post on Instagram

 

#lisilake#sunrise<3 love my life <3

A post shared by Sai Pallavi (@saipallavi.senthamarai) on

पल्लवीनं पदार्पणाच्या 'फिदा' सिनेमातूनच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आपल्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पल्लवीचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. तिच्या बाबतची अगदी लहानात लहान गोष्ट जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात.  दिग्दर्शक अल्फोंज पुथरिन यांनी 2014मध्ये पल्लवीला 'प्रेमम' या सिनेमात मलारची भूमिका ऑफर क्ली होती. ज्याला साउथचा फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता.

 

View this post on Instagram

 

Vishu comes early this year ♥️ PC : @appollofoxx 🐥

A post shared by Sai Pallavi (@saipallavi.senthamarai) on

साई पल्लवी दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिला नेहमीच तिचा चेहरा जसा आहे तसा दाखवायला आवडतं. ती जास्त मेकअप पासून लांब असते आणि तिच्या या सिंपल लुकमळेच तिच्या लोकप्रियतेत एवढी वाढ झालेली आहे. तिनं साउथमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.

'या' व्यक्तीमुळे अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाला होतोय उशीर

टीम इंडियाचा विजय मोठ्या पडद्यावर, '83' सिनेमाच्या निमित्तानं आदिनाथ कोठारेशी गप्पा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2019 08:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading