• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • का करते मेकअपला विरोध?; साई पल्लवीनं सांगितलं ‘No Make-Up’ निर्णयाचं कारण

का करते मेकअपला विरोध?; साई पल्लवीनं सांगितलं ‘No Make-Up’ निर्णयाचं कारण

कोट्यवधींच्या जाहिरातींना नकार देणारी साई पल्लवी आज आहे सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

 • Share this:
  मुंबई 9 मे: साई पल्लवी (Sai Pallavi) ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज तिचा वाढदिवस आहे. 29 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रेमम (Premam) या चित्रपटामुळं प्रकाशझोतात आलेली साई ही आपल्या सुंदर लूकमुळं नेहमीच चर्चेत असते. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल ती कधीच मेकअप करत नाही. किंबहूना ज्या चित्रपटात तिला मेकअप करण्यासाठी जबरदस्ती केली जाते त्या चित्रपटांना ती थेट नकारच देते. अन् तरी देखील आज ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. काही वर्षांपूर्वी टेड एक्समध्ये दिलेल्या भाषणात साईनं आपल्या करिअरवर भाष्य केलं होतं. त्यावेळी तिनं नो मेकअप या धोरणामागचं खरं कारण सांगितलं. ती म्हणाली होती, “मेकअप करण्याला माझा विरोध नाही. पण मेकअप का करावा? अन् त्या मागचा उद्देश काय हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपल्या देशात गौरवर्णीय महिलांना सुंदर म्हटलं जातं. त्यामुळं महिला गौरवर्णीय दिसण्यासाठी कॉस्मेटिकचा भरमसाठ वापर करतात. अन् या प्रवृत्तीला माझा विरोध आहे. कारण आपल्या त्वचेचा रंग कुठला असेल हे आपल्या हातात नाही. मग गोरं दिसण्याचा अट्टहास कशाला? अन् जे गोरे आहेत त्यामागे त्यांचं कर्तृत्व काय? त्यामुळं मी गोरं दिसण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मेकअप करत नाही. किंबहुना आहे तशीच मला लोकांनी स्विकारावं अशी माझी अपेक्षा आहे.” अर्जुन रेड्डीमुळं रातोरात झाला सुपरस्टार; पाहा दानशुर विजयचा थक्क करणारा प्रवास साईनं आपल्या करिअरमध्ये कधीही कुठल्याही फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीत काम केलेलं नाही. किंबहुना अनेक कोट्यवधींच्या जाहिरातींना विरोध केला आहे. शिवाय ज्या चित्रपटांमध्ये गोरं दिसण्यासाठी जबरदस्ती केली ते चित्रपट देखील तिनं सोडले आहेत. अन् तिच्या याच शैलीमुळं आज ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत तिनं कस्तुरी, प्रेमम, काली, दिया, मारी, लव्ह स्टोरी यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: