या सुपरस्टारला किस करायला नकार देणं अभिनेत्रीला पडलं महाग, सिनेमातूनच काढलं बाहेर

या सुपरस्टारला किस करायला नकार देणं अभिनेत्रीला पडलं महाग, सिनेमातूनच काढलं बाहेर

निर्माता आणि दिग्दर्शकांच्या मते ही कथेची गरज होती. मात्र साई पल्लवीने हा सीन करण्यास स्पष्ट नकार दिला.

  • Share this:

मुंबई, 18 जुलै- कबीर सिंग सिनेमा हिट झाल्यानंतर बॉलिवूडकरांना विजय देवरकोंडा नावाचाही एक अभिनेता आहे याची ओळख झाली. दाक्षिणात्य सिनेमा अर्जुन रेड्डीचा हा अधिकृत रिमेक होता. अर्जुन रेड्डीमध्ये विजयने मुख्य भूमिका साकारली होती. या सिनेमाशिवाय विजयचं नाव नोटा आणि गीता गोविंदम यांसारख्या सिनेमामुळे देशभरात झालं. हे तीनही सिनेमे सुपरहिट होते. फक्त दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही या सिनेमांची चांगलीच चर्चा झाली होती. आता प्रभासप्रमाणेच विजयच्या सिनेमांकडे इतर भाषिक प्रेक्षकांचं लक्ष असतं.

विजय लवकरच डिअर कॉमरेड या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजयचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. सुरुवातीला या सिनेमात सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी काम करणार होती. मात्र आता या सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे. ज्या किसिंग सीनबद्दल बोलत आहोत तो किसिंग सीन सिनेमाच्या ट्रेलरमध्येही दाखवण्यात आला आहे.डिअर कॉमरेड सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये रश्मिका मंदाना आणि विजय यांचा एक हॉट किसिंग सीन आहे. सुरुवातीला हा किसिंग सीन साई पल्लवीवर शूट करण्यात येणार होता. मात्र तिने विजय देवरकोंडाला ऑन स्क्रिन किस करण्यास नकार दिला. निर्माता आणि दिग्दर्शकांच्या मते ही कथेची गरज होती. मात्र साई पल्लवीने हा सीन करण्यास स्पष्ट नकार दिला. दिग्दर्शक आणि अभिनेत्रीच्या वादात अखेर पल्लवीला सिनेमातून काढण्यात आलं आणि तिच्या जागी रश्मिकाला घेण्यात आलं.

किसिंग सीनमुळे अभिनेत्रीचा साखरपुडा तुटण्याची अफवा- या सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर रश्मिकाचा साखरपुडा तुटल्याच्या बातम्या सिनेवर्तुळात फिरत होत्या. रश्मिकाने काही दिवसांपूर्वी कन्नड अभिनेता रक्षत शेट्टीशी साखरपुडा केला होता. मात्र आता दोघांच्या नात्यात दुरावा आल्याने रक्षतने साखरपुडा मोडल्याचं म्हटलं जात आहे.

यात आता साई पल्लवीने किसच्या सीनमुळे सिनेमाला नकार दिल्यामुळे रक्षत- रश्मिकाच्या नात्यावर अधिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, साई पल्लवीने किसिंग सीनमुळे सिनेमा करण्यास नकार दिल्याने सोशल मीडियावर तिचं कौतुकच केलं जात आहे.

बिकीनी घातली नाही म्हणून अभिनेत्रीचं झालं कोट्यवधीचं नुकसान

लग्नाआधीच अर्जुन रामपाल पुन्हा झाला बाबा, गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म

'या' अभिनेत्रीने एक्स पतीला दिल्या दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छा, म्हणाली...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 04:48 PM IST

ताज्या बातम्या