मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सई-दीप पहिली Marriage Anniversary साजरी करण्यासाठी पोहचले खास ठिकाणी, फोटो होतायत व्हायरल

सई-दीप पहिली Marriage Anniversary साजरी करण्यासाठी पोहचले खास ठिकाणी, फोटो होतायत व्हायरल

मराठमोळी अभिनेत्री सई लोकूरने तीर्थदीप रॉयसोबत 30 नोव्हेंबर 2020 रोजी लग्नगाठ बांधली होती. आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

मराठमोळी अभिनेत्री सई लोकूरने तीर्थदीप रॉयसोबत 30 नोव्हेंबर 2020 रोजी लग्नगाठ बांधली होती. आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

मराठमोळी अभिनेत्री सई लोकूरने तीर्थदीप रॉयसोबत 30 नोव्हेंबर 2020 रोजी लग्नगाठ बांधली होती. आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 30 नोव्हेंबर- 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाने प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर  होय. सई लोकूर सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो शेयर करत असते.सईने तीर्थदीप रॉयसोबत 30 नोव्हेंबर 2020 रोजी लग्नगाठ बांधली होती. तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त सई-दीप (sai lokur and  tirthadeep roy) सिक्कीममध्ये first Anniversary Celebration करत आहेत. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काही दिवसापूर्वी सई पती तीर्थदीपसोबत विमानतळावर स्पॉट झाली होती. त्यावेळी तिनं विमानतळावरचे काही फोटो व व्हिडिओ देखील शेअर केले होते. आता राजश्री मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टावर सई-दीपचं सिक्कीम येथील काही फोटो शेअर केले आहेत. या दोघेही खूप आनंदात आणि मस्ती करताना दिसत आहेत. राजश्री मराठीने हे फोटो शेअर करत म्हटलं होते की, सई-दीपचं सिक्कीममध्ये first Anniversary Celebration. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त ही जोडी सिक्कीमध्ये पोहचली आहे आणि तिथल्या थंडीचा आनंद घेते आहे. त्यांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वाचा :गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; हटके वरमाला चर्चेत 

सई आणि तीर्थदीपची लव्हस्टोरीसुद्धा फारच इंटरेस्टिंग होती. यांच्या लव्हस्टोरीची मोठी चर्चा रंगली होती. कारण हे दोघे मॅट्रोमोनी सोशल मीडिया साईटवर भेटले होते. येथेच या दोघांची ओळख झाली होती. त्यांनतर या दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं, आणि लग्नाचा निर्णय घेतला होता.सईने तीर्थदीप रॉयसोबत 30 नोव्हेंबर 2020 रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या दहा महिन्यानंतर सई पतीसोबत मालदीवला हनिमूनसाठी गेली होती. यावेळी तिच्या हनिमून लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.

सई लोकूरने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभाग घेतला होता. या शोमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. अभिनेत्री या घरामध्ये तब्बल १०० दिवस टिकून राहिली होती. चाहत्यांनी सईला मोठा सपोर्ट केला होता. मात्र ती हा सो जिंकू शकली नव्हती.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment