Home /News /entertainment /

'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत सरिता वहिनींनी दिली Good News, मात्र यामुळे अवनीच्या बाळाचं काय होणार?

'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत सरिता वहिनींनी दिली Good News, मात्र यामुळे अवनीच्या बाळाचं काय होणार?

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'सहकुटुंब सहपरिवार' (Sahkutumb Sahparivar) ही मालिका प्रेक्षकांच्या आवडती मालिका आहे. मालिकेत सध्या अवनीने मुलीला जन्म दिला आहे तर दुसरीकडे सरिता वहिनींकडे देखील गुड न्यूज आहे.

    मुंबई, 16 जानेवारी- स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'सहकुटुंब सहपरिवार' (Sahkutumb Sahparivar) ही मालिका प्रेक्षकांच्या आवडती मालिका आहे. मालिकेत सध्या आनंदाचे वातावरण आहे. अवनीने मुलीला जन्म दिला आहे. घरात एका नव्या पाहुण्याचे आगमन झालं आहे. यासोबतच तिनं आई होण्याचा हक्क देखील सरिता वहिनींना दिला आहे. आता या सगळ्यात सरिता वहिनी देखील आई होणार आहेत त्यामुळे अवनीच्या बाळाचं काय होणार असा प्रश्न तर आहेच. शिवाय यामुळे अवनी आणि सरिता वहिनींमध्ये गैरसमज होणार का असा देखील प्रश्न पडला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने नुकताच एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये सरिता वहिनी बाळाल घेऊन बसलेल्या असतात आणि त्यांना डॉक्टरांचा फोन येतो. त्यांना सांगितलं जातं की तुम्ही आई होणार आहात. त्याचवेळी त्यांना आनंद होतं. मात्र त्यांना तेवढ्यात उलटी येते आणि त्या कडेवरच्या बाळाला तसचं सोप्यावर ठेवून निघून जातात. हे सगळं अवनी पाहिते आणि म्हणते की, कळा सोसून बाळाला जन्म घालणं आणि दुसऱ्याचं बाळ आपले म्हणणं वेगळं.त्यामुळे सरिताच्या आई होण्यामुळे घरात आनंद येणार की, अवनी व सरिताच्या नात्यात दुरावा निर्माण होणार, असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना सतावत आहे. येणाऱ्या भागातच आता याबद्दल माहिती मिळेल. मात्र अवनीच्या बाळाच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण आहे. सर्वांनी बाळाचं जोरात स्वागत देखील केलं आहे.
    View this post on Instagram

    A post shared by Star Pravah (@star_pravah)

    'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत एकत्र कुटुंब आणि त्यामध्ये असणारे नाते संबंध आणि प्रेम याचे दर्शन यातून होते. आई वडिलांच्या पाठिमागे मोठा भाऊ आणि वहिनी आपल्या भांवडांचा पोटच्या पोरांप्रमाणे कसा सांभाळ करतात (Sahkutumb Sahparivar latest episode) याचे दर्शन यातून होते. आता सरिता वहिनीच आई होणार आहेत. त्यामुळे याचा या भावडांवर कसा परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials

    पुढील बातम्या