Home /News /entertainment /

ढल गया दिन हो गयी शाम! आशा मामींवर चढला बॅडमिंटन फिव्हर, Video होतोय तुफान Viral

ढल गया दिन हो गयी शाम! आशा मामींवर चढला बॅडमिंटन फिव्हर, Video होतोय तुफान Viral

सतत रिल्स शेअर करणाऱ्या आशा मामींना यावेळी मात्र बॅडमिंटनचा फिव्हर चढल्याचं पाहायला मिळत. पाहा त्यांचा खास व्हिडीओ

  मुंबई, 01 जुलै: स्टार प्रवाहवरील (Star Pravah) सहकुटुंब सहपरिवार (sahkutumb sahparivar )  ही मालिका सध्या चांगल्या ट्रॅकवर सुरू आहे. मालिकेत सगळे कलाकार ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन धम्माल करताना दिसतात.  अंजी, अवनी आणि मामींची जोडी तर सोशल मीडियावर चांगलीच हिट आहे. सीन्सच्या मधल्या वेळेत कलाकार रिल्स शुट करण्याचे काम करत असतात. आशा मामींचे रिल्सतर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.  सतत रिल्स शेअर करणाऱ्या आशा मामींना यावेळी मात्र बॅडमिंटनचा फिव्हर चढल्याचं पाहायला मिळत. मामींनी सोबत मामांना देखील घेतलं आहे. दोघांचा बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. आशा मामी म्हणजे अभिनेत्री किशोरी अंबिये (kishori ambiye ) या सगळ्यात पुढे असतात. किशोरी अंबिये सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्या अनेक रिल्स व्हिडीओ शेअर करत असतात.  किशोरी अंबिये यांनी नुकताच मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडीओ केला आहे. ज्यात त्या बॅडमिंटन खेळत आहेत. 'ढल गया दिन हो गयी शाम', असं गाणं वाजवत 'BTSऑन सेट, मज्जा, मस्ती, धम्माल', असं कॅप्शन देत किशोरी अंबिये यांनी शेअर केला आहे.
  हेही - PHOTO: क्यूट परीच्या स्वीट Pose! तुम्हाला कुठली आवडली ? किशोरी अंबिये म्हणजेच मालिकेतील आशा मामींना हटके बॅडमिंटन खेळताना पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्स करत कमेंट बॉक्स भरुन टाकलाय. 'तुम्ही फार चांगल्या बॅडमिंटन खेळता', असं म्हणत अनेकांनी कौतुक केलं आहे. एका युझरनं म्हटलंय, 'अरे वा जोडीने खेळताय किती मस्त'. ऐंशी आणि नव्वदता काळ गाजवणाऱ्या अनेक अभिनेत्री नव्याने टेलिव्हिजनवर परतल्या आहेत. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे किशोरी अंबिये. 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत ओमच्या आईच्या भूमिकेत किशोरी अंबिये प्रेक्षकांसमोर आल्या. तसंच सहकुटुंब सहपरिवार मालिकेतही त्यांची चांगलीच धम्माल उडवून दिली आहे. त्यांनी साकारलेली आशा मामी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee Marathi

  पुढील बातम्या