मुंबई, 24 मार्च : आजकाल अनेक कलाकार महागड्या, आलिशान गाड्या खरेदी करत आहेत. यात मराठी सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. अनेक कलाकार यंदाच्या वर्षी आलिशान गाड्यांचे मालक होत आहेत. आता यात एका अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. स्टार प्रवाह वरील प्रसिद्ध मालिका सहकुटुंब सहपरिवार मधील अभिनेत्रीने महागडी कार खरेदी करत स्वतःच एक स्वप्न पूर्ण केलं आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
मराठी मालिक आणि चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री नंदिता पाटकर हिने तिचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने तिने स्वतःलाच एक नवीकोरी गाडी गिफ्ट केली आहे. गाडीबरोबरचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर करत तिने चाहत्यांना ही माहिती दिली. नंदिताने लाल रंगाची Hyundai i20 कार खरेदी केली आहे. या गाडीबरोबरचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांसोबत तिच्या आयुष्यातील एक खास किस्सा देखील शेअर केला आहे.
नंदिताने गाडीसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे कि, 'जी मुलगी लाल रंगाची लिपस्टीकही वापरत नाही तिने आज लाल रंगाची गाडी खरेदी केली आहे. लाल रंगाची गाडी खरेदी करायची की नाही याबाबत मला शंकाच होती. पण नव्या वर्षामध्ये आयुष्यात काही नवे बदल घडवून आणण्याचा मी निर्णय घेतला पण मी या वर्षी आयुष्यात काही नवीन बदल घडवायचे ठरवले. आणि म्हणूनच तुम्हाला सर्वात जास्त घाबरवणाऱ्या गोष्टीपासून सुरुवात का करू नये....तर ती अखेर इथे आली...ती खूपच छान दिसत होती....ते खरंच पहिल्या नजरेतलं प्रेम होतं....नवीन वर्षाची सुरुवात इतक्या छान पद्धतीनं झाली.... कुटुंबिय, मित्र परिवार व माझ्या जवळच्या व्यक्तींच्या आशिर्वाद, प्रेमाने मी माझ्या गाडीचे जोरदार स्वागत केले.' असं म्हणत नंदिताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
नंदिताने गाडीबरोबरचे फोटो शेअर करताच कमेंट्सच्या माध्यमातून चाहते तिचं अभिनंदन करत आहेत. त्याचबरोबर सहकलाकारांनी देखील नंदिताचा अभिनंदन केलं आहे. नंदिताने खरेदी केलेल्या गाडी किंमत ६ ते ९ लाख रुपयांच्या घरात आहे.
नंदिता सध्या स्टार प्रवाह वरील प्रसिद्ध मालिका सहकुटुंब सहपरिवार मध्ये काम करत आहे. या मालिकेत तिची सरिता वहिनी ही भूमिका घराघरात लोकप्रिय आहे. याचबरोबर नंदिता ही नुकतीच सिद्धार्थ जाधव सोबत बालभारती या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली होती. नंदिता तिच्या साध्या शैली आणि दमदार अभिनयाने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकते. आता तिने गाडी खरेदी केल्याने चाहतेही खुश असून तिला शुभेच्छा देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.