मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Video : अभिनेत्री दमून घरी आली, दूध गरम करायला गेली अन् घडलं असं काही...

Video : अभिनेत्री दमून घरी आली, दूध गरम करायला गेली अन् घडलं असं काही...

sakshee gandhi

sakshee gandhi

अभिनेत्रीनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिनं कामावरून घरी जाताच तिच्याबरोबर नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 08 मार्च : मराठी टेलिव्हिजन विश्वात अनेक नवे चेहरे पाहायला मिळत आहेत. मराठी मालिकांमध्ये एक गोष्ट अनेक वर्षांपासून कॉमन ठेवण्यात आली आहे ती म्हणजे कुटुंब. प्रत्येक मालिकेत एक कुटुंब आहे. तेही 2-4 जणांचं नाही तर 9-10 माणसांचं कुटुंब. अशाच एक कुटुंबाची मालिका म्हणजे जिच्या नावातच कुटुंब आहे. स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेत अनेक नवे चेहरे पाहायला मिळाले. अंजी, पश्या, अवनी, वैभव, गुड्डी अशी अनेक पात्र मालिकेत आहेत. प्रत्येक पात्र साकारणारे कलाकार देखील नवीन आहेत. त्यातील अवनीचं पात्र साकारमारी अभिनेत्री साक्षी गांधी ही अल्पावधीत घराघरात पोहोचली. साक्षीची ही पहिलीच मालिका आहे.

अभिनेत्री साक्षीनं मालिकेतीन अवनी अगदी उत्तम वठवली आहे. साक्षी ही मुळची चिपळूनची आहे.  कामानिमित्त ती मुंबईत बॅचलर्स म्हणून राहते.  सखीकडे अभिनय तर आहेच पण तिच्या सौंदर्यावरही अनेक जण फिदा आहेत. साक्षीला सोशल मीडियावर देखील हजारो फॅन्स फॉलो करतात. सखी सोशल मीडियावर अँक्टिव्ह असते. नुकताच तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिनं कामावरून घरी जाताच तिच्याबरोबर नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

हेही वाचा - सहकुटुंब सहपरिवार मालिकेतून अंजीची एक्झिट? अभिनेत्री कोमल कुंभारची जागा घेणार 'ही' अभिनेत्री

साक्षीनं तिच्या व्हिडीओमध्ये म्हटलंय, "तुम्ही बाहेरून आला आहात आणि तुम्हाला गरमगरम कॉफी प्यावीशी वाटते. म्हणून तुम्ही गॅसवर दुध गरम करायला ठेवता.  त्यानंतर तुम्ही बाहेर येता आणि दीड-दोन तास एकाच ठिकाणी बसून राहता. तुमच्याबरोबर होत का असं कधी? होतं असं होतं? प्रत्येकाकडून कधी ना कधी होत. माझ्याबाबतीत आताच असं झालं की मी बाहेरून आले दुध गरम करायला ठेवलं आणि दीड-दोन तास मोबाईलवर इतरांचे रिल्स पाहत बसले होते आणि दूध ओतू गेलं".

साक्षी पुढे म्हणाली, "आता का आता उठावं लागणार आहे. कारण ओतू गेलेलं दूध, झालेला पसारा, चिकटपणा सगळं आवरावं लागणार आहे. पण नाराज व्हायचं नाही. दूध ओतू गेलेलं चांगलं असतं. त्यामुळे आता उद्याही घरी यायचं दूध गरम करत ठेवायचं आणि असंच दीड-दोन तास बसून राहायचं".

साक्षीच्या या मजेशीर व्हिडीओनंतर सगळ्यांनीच डोक्याला हात मारलाय. साक्षीबरोबर घडलेला हा प्रकार अनेकांबरोबर अनेकवेळा होतो. त्यामुळे तिच्या व्हिडीओवर फॅन्सनं कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युझरनं लिहिलंय, "दुध उतुच नाही जात फक्त कधी कधी पातेल जळून करपुन पण जात. नंतर ते साफ करताना नकोनको होतं". तर दुसऱ्यानं म्हटलंय, "गॅस खूप खराब होतो". तर एका युझरनं, "तुझ्या घरी कामवाली बाई नाहीये का?", असा प्रश्नही तिला विचारला आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news, Marathi Serial