Home /News /entertainment /

'सहकुटुंब सहपरिवार' फेम या अभिनेत्यचा थाटात पार पडला साखरपुडा, Photo आले समोर

'सहकुटुंब सहपरिवार' फेम या अभिनेत्यचा थाटात पार पडला साखरपुडा, Photo आले समोर

'सहकुटुंब सहपरिवार' (sahkutumb sahaparivar) फेम अभिनेत्याने नुकताच साखरपुडा केला आहे. त्याच्या साखरपुड्याचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  मुंबई, 16 मे- स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सहकुटुंब सहपरिवार' (sahkutumb sahaparivar) मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिका एकत्र कुटुंब यावर अवलंबून आहे. भावांच्यात असणारे प्रेम यातून दाखवण्यात आलं आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे. या मालिकेतील अंजी आणि पशाची जोडी तर प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत पशाची भूमिका अभिनेकात आकाश नलावडे साकरताना दिसतो. आता आकाश नलावडेला ( Akash Nalawade) त्याच्या खऱ्य़ा आयुष्यातील अंजी भेटली आहे. नुकताच त्याचा साखरपुडा झाला आहे. त्याचे काही सुंदर फोटो ( akash nalawade engagement photos) समोर आले आहेत. आकाश नलावडेने त्याच्या इन्स्टा स्टोरील साखरपुड्याचे काही सुंदर फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. त्याच्या रिअल लाइफ अंजीचे नाव रूचिका धुरी ( Ruchika Dhuri ) आहे. या दोघांच्या साखरपुड्याला शुभप्रसंगी सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील कलाकारांनीही हजेरी लावल्याचं दिसून आलं.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  रुचिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. आकाशसोबत नेहमीच ती व्हिडिओ व फोटो शेअर करत असते. चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
  आकाश नलावडे देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. मालिकेतील कलाकारांसोबत तो भन्नाट रील्स शेअर करत असतो. त्याला यामध्ये अंजी देखील साथ देत असते. सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. पशा अंजीला घेऊन घरी आला आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्यात आलेला दुरावा दूर होऊन पहिल्यासारखी अंजी आणि पशाची जोडी प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या