'सही रे सही' फेम अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

'सही रे सही' फेम अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन विश्वासाठी एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक आणि दु:खद बातम्या 2020 या वर्षात समोर येत आहेत. मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीला चटका लावणारी आणखी एक घटना आज घडली आहे. '

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : मनोरंजन विश्वासाठी एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक आणि दु:खद बातम्या 2020 या  वर्षात समोर येत आहेत. मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीला चटका लावणारी आणखी एक घटना आज घडली आहे. 'सही रे सही' (Sahi Re Sahi) फेम अभिनेत्री गीतांजली कांबळी (Geetanjali Kambali) यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून त्या या आजाराशी झुंज देत होत्या.

गीतांजली कांबळी यांच्यावर मुंबईमधील चर्नीरोड याठिकाणी असणाऱ्या सैफी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

शनिवारी अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे. आज पहाटे त्यांचे मुंबईमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. गीतांजली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण याठिकाणच्या होत्या. मुंबईत त्या कामानिमित्त आल्या होत्या. याठिकाणी त्यांनी त्यांची अशी ओळख मिळवली होती.  मात्र त्यांना या काळात कॅन्सरने ग्रासले होते, गेला काही काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते.

(हे वाचा-ड्रग्जसंबंधी चौकशीनंतर दीपिका पहिल्यांदाच झाली व्यक्त; सोशल मीडिया पोस्ट व्हायरल)

केदार जाधव दिग्दर्शित 'सही रे सही' या नाटकात अभिनेता भरत (Bharat Jadhav) जाधवबरोबर गीतांजली कांबळी यांनी केलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच मालवणी नटसम्राट दिवंगत मच्छिंद्र कांबळी यांच्या 'वस्त्रहरण' नाटकातही त्यांची भूमिका गाजली होती.  गीतांजली यांनी 50 हून अधिक व्यावसायिक नाटकात अभिनय केला आहे. 'बकुळा नामदेव घोटाळे', 'टाटा बिर्ला', 'गलगले निघाले' या सिनेमात देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या.

काही मीडिया अहवालानुसार 2012 पासून त्या कर्करोगाचा सामना करत होत्या. त्यांची आर्थिक परिस्थितीही अगदी बेताची होती. आयुष्यभर त्यांनी मालवणी नाट्यक्षेत्रासाठी काम केले. कोरोना काळातील लॉकडाऊनध्ये नाटकांचे दौरे बंद असल्याने त्यांच्यासमोरील संकट आणखी वाढले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी मदतीचे आवाहन देखील केले होते. त्यांच्या या संपूर्ण प्रवासात गीतांजली यांचे पती लवराज कांबळी त्यांच्याबरोबर होते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 24, 2020, 11:43 AM IST

ताज्या बातम्या