आली लहर अन् अँजेलिनासारखं दिसण्यासाठी केला 'कहर', आता दिसतेय अशी !

आली लहर अन् अँजेलिनासारखं दिसण्यासाठी केला 'कहर', आता दिसतेय अशी !

अभिनेत्री अँजेलिना जोली सारखं दिसण्यासाठी चक्क 50 वेळा स्वत:च्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली आहे. शरीरावर इतक्यावेळा प्लास्टिक सर्जरी झाल्यामुळे सहर आता विचित्र दिसायला लागली आहे. खरतर सहर करायला गेली एक आणि जालं भलतंच!

  • Share this:

30 नोव्हेंबर : आपल्या आवडत्या अभिनेत्याचं किंवा आवडत्या अभिनेत्रीचं हातावर नाव लिहणं, त्यांचा टॅटू काढणं, त्यांच्यासारखे कपडे घालणं, त्यांच्या फोटोंचा संग्रह करणं हे 'जबरा' फॅनची साहजिक लक्षणं असतात. पण सगळ्या कारणाम्यांना पुरून उरत इराकमधल्या सहरने तिच्या आवडत्या अभिनेत्री अँजेलिना जोली सारखं दिसण्यासाठी चक्क 50 वेळा स्वत:च्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली आहे.

सहर ही फक्त 19 वर्षांची आहे. ती अँजेलिना जोलीची डाय हार्ट फॅन आहे. सहरने अँजेलिनासारखं दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली खरी पण ती अयशस्वी झाल्यामुळे तिने पुन्हा एकदा सर्जरी केली, आता ही पण यशस्वी झाली नाही म्हणून तिने पुन्हा प्लास्टिक सर्जरी केली, असं करता करता तिने चक्क 50वेळा प्लास्टिक सर्जरी केली. विश्वास होत नाही ना? पण हे खरं आहे. तिने तिच्या सोशल अकाऊंटवरुन तिचे सगळे फोटो शेअर केले आहेत. शरीरावर इतक्यावेळा प्लास्टिक सर्जरी झाल्यामुळे सहर आता विचित्र दिसायला लागली आहे. खरतर सहर करायला गेली एक आणि जालं भलतंच!

50वेळा प्लास्टिक सर्जरी

50वेळा प्लास्टिक सर्जरी

बरं ती इतक्यावर थांबली नाही तर तिने तिचं वजनही कमी केलं आहे. ते कायम करण्यासाठी तिने कठीण डायट सुद्धा केलं आहे. त्यामुळे तिचं वजन फक्त 40 किलो आहे आणि गंमत म्हणजे ते तिला अँजेलिनासारखे वाटते. सहरने तिने केलेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या सर्जऱ्यांचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. इंस्टाग्रामवर तिचे 4 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. तिच्या या 'फॅनगिरी'मुळे तिच्या फोटोंवर हास्यास्पद प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी तर तिला 'भूत' असंही म्हटलं आहे. या सगळ्यामुळे सोशल मीडियार ती चांगलीच ट्रोल झाली आहे.

داشيامو دوس دارم..!👅🖕🏻

A post shared by سحرتبر..!👾✌🏻 (@sahartabar_official) on

باهامه كل تهران..!👅🖕🏻

A post shared by سحرتبر..!👾✌🏻 (@sahartabar_official) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 09:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading