'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार

अभिनेत्री सागरिका घाटगे 'चक दे'मध्ये हाॅकी खेळल्यानंतर आता आणखी खेळ खेळायला सज्ज झालीय. तो म्हणजे फुटबाॅल.

News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2018 11:07 AM IST

'चक दे गर्ल' आता होणार फुटबाॅलपटू, लग्नानंतर सागरिकाचा नवा अवतार

मुंबई, 15 आॅक्टोबर : अभिनेत्री सागरिका घाटगे 'चक दे'मध्ये हाॅकी खेळल्यानंतर आता आणखी खेळ खेळायला सज्ज झालीय. तो म्हणजे फुटबाॅल. आणि हा फुटबाॅल ती साडी नेसून खेळणार आहे.

'मान्सून फुटबाॅल'मध्ये सागरिका फुटबाॅल खेळणार आहे. याआधी सागरिकानं मराठीत प्रेमाचा खेळ खेळला होता. 'प्रेमाची गोष्ट'मध्ये सागरिकाची जोडी अतुल कुलकर्णीबरोबर झळकली होती. 'मान्सून फुटबॉल'मध्ये अभिनेत्री सागरिका घाटगे, चित्रांशी रावत, विद्या माळवदे, डेलनाझ इराणी, प्रीतम कागणे, उषा नाईक अशी दमदार स्टारकास्ट आहे. या सगळ्या अभिनेत्री साडी नेसलली असतानाच फुटबॉल खेळताना दिसतील. गृहिणी झाल्यावर आपली पुसली गेलेली ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेला लढा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

याशिवाय हलाल, लेथ जोशी, ३१ ऑक्टोबर, परफ्युम अशा चित्रपटांसाठी अनेक पुरस्कार मिळवलेला निर्माता, सह दिग्दर्शक आणि प्रस्तुतकर्ता अमोल कागणे आता अभिनयात पदार्पण करत आहे. मिलिंद उके दिग्दर्शित "मान्सून फुटबॉल" चित्रपटातून अमोल अभिनयाची इनिंग सुरू करत असून, तो गुजराती पतीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून अमोलनं नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे. आतापर्यंत त्यांना २६ हून अधिक नाटकं आणि 4 चित्रपटांची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या भारत रंग महोत्सवात त्यानं नाटकही सादर केलं आहे.

मान्सून फुटबॉल या चित्रपटातील भूमिका ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. अशा चांगल्या चित्रपटाचा एक भाग असणं माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आहे. माझ्या वाट्याला गुजराती व्यक्तीची भूमिका आली आहे. मी मराठी असल्याने ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. माझ्या मेकअप दादांकडून गुजराती शिकलो, लहेजा समजून घेतला. तसंच माझ्या अनेक गुजराती मित्रांबरोबर राहून वागणं-बोलणंही समजून घेतलं. या भूमिकेसाठी मी जवळपास सहा किलो वजन वाढवलं आहे,' असं अमोलनं सांगितलं.

Loading...

सनी लिओन नवऱ्यासोबत एंजाॅय करतेय सुट्टी, शेअर केले PHOTOS

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2018 11:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...