पु. ल. देशपांडे साकारल्यानंतर सागर देशमुखसमोर आता नवं आव्हान

प्रेक्षकांना जितक्या निव्वळ करमणूकप्रधान मालिका पाहायला आवडतात, तितक्याच वास्तववादी मालिकाही. म्हणूनच आता पुन्हा एकदा इतिहासाची काही महत्त्वाची पानं आपल्या समोर येणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2019 11:59 AM IST

पु. ल. देशपांडे साकारल्यानंतर सागर देशमुखसमोर आता नवं आव्हान

मुंबई, 28 मार्च : बायोपिक सिनेमे, ऐतिहासिक मालिका यात प्रेक्षक रमतात. प्रेक्षकांना जितक्या निव्वळ करमणूकप्रधान मालिका पाहायला आवडतात, तितक्याच वास्तववादी मालिकाही. म्हणूनच आता पुन्हा एकदा इतिहासाची काही महत्त्वाची पानं आपल्या समोर येणार आहेत.

भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांचे जीवनचरित्र हे इतिहासातलं एक महान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान पुन्हा उलगडलं जाणार आहे ‘स्टार प्रवाह’वर लवकरच सुरू होणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता,लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण आणि राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरतं.

अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय. या भूमिकेविषयी सांगताना तो म्हणाला, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. बाबासाहेबांचं कर्तृत्व खरंच महान आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मला नव्याने आंबेडकर उलगडत आहेत. एक अभिनेता म्हणून मी श्रीमंत होतोय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.’

सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. महामानवाचं हे महानकार्य मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न ‘स्टार प्रवाह’ वाहिनी करणार आहे

स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे या भव्यदिव्य मालिकेविषयी म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं गौरवशाली कार्य ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महामानवाचं हे महान कार्य मालिकेतून पोहोचवण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जाणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण ते महामानवापर्यंतचा प्रवास मालिकेत पाहायला मिळणार आहे. ’

Loading...

‘भीमजी रामजी आंबेडकर’ यांचा प्रवास हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ इथपर्यंत झाला. ही नवी मालिका १५ एप्रिलपासून रात्री ९.०० वाजता  स्टार प्रवाहवर सुरू होतेय.


SPECIAL REPORT: 'रंगिला गर्ल'मुळे काँग्रेसवर पडेल का विजयाचा रंग?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 11:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...