Sacred Games Season 2 : शाळेत दोनदा नापास झालेला 'बंटी', एका रात्रीत असं बदललं नशीब

मुळचा दिल्लीचा जतिन सरना याच्या कुटुंबावर फार कर्ज होतं. तो एका संयुक्त कुटूंबात राहत होता. दिल्लीतच त्याचं शालेय शिक्षण झालं.

  • Share this:

नेटफ्लिक्सची सीरिज सेक्रेड गेम्सने जगभरात प्रचंड प्रसिद्धी मिळवली. आपल्या वादग्रस्त कथेसाठी ही सीरिज पहिल्या दिवसापासून चर्चेत होती. या सीरिजसोबत जतिन सरना उर्फ बंटी एका रात्रीत स्टार झाला. काही दिवसांपूर्वीच जतिनने त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल आणि सिनेसृष्टीतील स्ट्रगलबद्दल सांगितले.

मुळचा दिल्लीचा जतिन सरना याच्या कुटुंबावर फार कर्ज होतं. तो एका संयुक्त कुटूंबात राहत होता. दिल्लीतच त्याचं शालेय शिक्षण झालं. मात्र तो नववीत असताना नापास झाला होता. त्यामुळे १० वीची परीक्षा त्याने बाहेरून दिली. ११ वीत तो पुन्हा नापास झाला. १२ वीत तो कसा बसा पास झाला.

घरात असलेल्या पैशांच्या तंगीमुळे त्याला घरातून दूर जावसं वाटत होतं. लहानपणापासूनच त्याला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं होतं. शाळेतील एका कार्यक्रमात अक्षय कुमारच्या मोहरा सिनेमातील एका गाण्याच्या ड्रेसअपमध्ये जतित पोहोचला होता. त्यावेळी त्याची खिल्ली उडवण्यात आली.

एवढं सगळं होऊनही जतिन कधी उदास झाला नाही. कॉलेजचं शिक्षण संपवल्यावर त्याने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी घरातल्यांनीही त्याला संमती दिली. घरून 5 हजार रुपये घेऊन जतिन 2004 मध्ये मुंबईत आला. पण अभिनयाचं शिक्षण घेतलेले नसल्यामुळे त्याच्या वाट्याला फार स्ट्रगल आलं.

Loading...

अनेकांनी त्याला काम देण्यास स्पष्ट नकार दिला. मुंबईत ज्यांचा जतिनला आधार होता त्यांनीही त्याची साथ सोडली. यानंतर जतिनला कळलं की, अभिनयाचं शिक्षण घेतल्याशिवाय काम मिळणं कठीण आहे. अखेर त्याने पुन्हा दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.

यानंतर त्याने पार्ट टाइम काम करायलाही सुरुवात केली. त्याला वडिलांच्या छोटेखानी व्यवसायात फारसं स्वारस्य नव्हतं. यानंतर त्याने एनएसडीमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला प्रवेश मिळाला नाही.

त्यानंतर जतिन श्रीराम सेंटर गेला आणि आपल्या परफॉर्मन्सने त्याने लोकांना इम्प्रेस केलं. ट्रेनिंग केल्यानंतर जतिनचा आत्मविश्वास वाढला. मुंबईत अनेक वर्ष छोट्या- मोठ्या भूमिका केल्यानंतर त्याला अनुराग कश्यपच्या सेक्रेड गेम्समध्ये बंटीची भूमिका मिळाली. या एका व्यक्तिरेखेने जतिन सरना एका रात्रीत स्टार झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...