Sacred Games 2 झाला ऑनलाइन लीक, निर्मात्यांना पायरसीचा फटका

Sacred Games 2 झाला ऑनलाइन लीक, निर्मात्यांना पायरसीचा फटका

तमिळ रॉकर्स नावाच्या एका वेबसाइटनं 'सेक्रेड गेम्स सीझन 2' ऑनलाइन लीक केला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 ऑगस्ट : काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सची सर्वात लोकप्रिय वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन रिलीज झाला. या सीझनला खूप चांगले रिव्ह्यूज मिळत आहेत. रिलीजच्या आधीपासूनच या सीझनची जोरदार चर्चा होती. रिलीजनंतर या सीझनला खूप चांगला प्रतिसादही लाभला मात्र आता याच्या मेकर्ससाठी एक वाईट बातमी आहे. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात येत आहे की हा सीझन ऑनलाइन लीक झाला आहे. ज्यामुळे या लिंक वरून ही वेबसीरिज ऑनलाइन डाउनलोड करून पाहिला जात आहे. या वृत्तामुळे वेबसीरिजच्या मेकर्सची झोप उडाली आहे. अशाप्रकारे एखादी वेबसीरिज लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी गेम ऑफ थ्रोन्स सुद्धा अशाप्रकारे ऑनलाइन लीक झाला होता.

अर्जुन कपूर लागला कॅटरिनाच्या मागे; या फोटोवरून केलं ट्रोल

तमिळ रॉकर्स नावाच्या एका वेबसाइटनं याआधीही अनेक बिग बजेट सिनेमा अशाचप्रकारे ऑनलाइन लीक केले आहेत. याच वेबसाइटनं आता सेक्रेड गेम्स सीझन 2 सुद्धा लीक केला आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या लिंक वरून सेक्रेड गेम्सचे सर्व एपिसोड धडाधड डाउनलोड केले जात आहेत. मकर्स या ऑनला लीक पासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही. ही वेब सीरिज ऑनलाइन लीक झाल्यानं आता याच्या व्ह्यूअरशिपवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

प्रेग्नन्सीच्या चर्चांवर भडकली विद्या बालन; म्हणाली, मागची 7 वर्ष...

तमिळ रॉकर्सनी अशाप्रकारे एखादा शो किंवा वेब सीरिज ऑनलाइन लीक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आधीही त्यांनी अनेक शो, सिनेमा आणि वेब सीरिजअशाप्रकारे ऑनलाइन लीक केल्या आहेत. एवढंच नाही हॉलिवूड वेबसीरिज ‘गेम ऑफ थ्रोन्स’ आणि ‘नार्कोस’ सुद्धा अशाचप्रकारे लीक झाले होते. ही वेबसाइट कोणतीही हॉलिवूड किंवा बिग बजेट बॉलिवूड सिनेमा पहिल्या दुसऱ्या दिवशीच लीक करत असते. बऱ्याच काळापासून ही वेबसाइट बंद करवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

कुणीतरी येणार गं! दीपिकाच्या ‘त्या’ कमेंटमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

‘सेक्रेड गेम्स 2’ ही वेबसीरिज निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि नीरज घेवाण यांनी मिळून बनवली आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी, सुरवीन चावला, ल्यूक केन्नी आणि कल्कि कोचलीन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

===================================================================

VIDEO: 'शिवाजी महाराजांनी लढायला शिकवलं', पूरग्रस्तांसाठी अक्षय कुमारचा खास संदेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 05:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading