Home /News /entertainment /

'गणेश गायतोंडे' नाही करणार वेब सीरिजमध्ये काम, अभिनेत्याने सांगितलं हे कारण

'गणेश गायतोंडे' नाही करणार वेब सीरिजमध्ये काम, अभिनेत्याने सांगितलं हे कारण

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) यानं मात्र आता वेब सीरिज करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. वाचा काय आहे यामागंच कारण

मुंबई, 21 जानेवारी: कोरोना साथीमुळे (Coronavirus Pandemic) गेल्या दोन वर्षात चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होण्याचं प्रमाण खूप कमी झालं. चित्रपट निर्मितीवरही परिणाम झाला होता, त्यामुळं पूर्वी तयार असलेले काही चित्रपट यंदा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आले तर काही चित्रपट ओटीटीवर (OTT) प्रदर्शित करण्यात आले. घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून विविध चॅनेल्स,अॅप्सद्वारे मोबाइल किंवा लॅपटॉपवर चित्रपट, मालिका असा सगळा कंटेंट ओटीटीवर बघता येणं शक्य आहे. त्यामुळं सध्या ओटीटीआणि वेब सीरिज (Latest Web series) लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे बॉलीवूडमधील बडे स्टार्सदेखील ओटीटीवर (OTT) पदार्पण करत आहेत. अनेक अभिनेत्यांच्या वेबसीरिज चांगल्याच गाजल्या आहेत. त्याचवेळी अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) यानं वेब सीरिज करणार नसल्याचं म्हटलं आहे. आपली विवेकबुद्धी आपल्याला त्यासाठी परवानगी देत नसल्याचं त्यानं म्हटलं आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून (NSD) शिक्षण घेतल्यानंतर जवळपास 15 वर्षे छोट्या-छोट्या भूमिका केल्यानंतर नवाझुद्दीनला 'गँग्ज ऑफ वासेपूर'मुळे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी मिळाली, मग मात्र त्यानं मागं वळून पाहिलं नाही. आपल्या कसदार अभिनयासाठी आणि वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या, अनेक पुरस्कार जिंकलेल्या नवाझुद्दीननं वेबसीरिजमध्ये काम करण्यात रस नसल्याचं सांगितल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नवाझुद्दीन सिद्दीकीने 'सेक्रेड गेम्स' (Secred Games) सारख्या सुपरहिट वेब सीरिजमध्ये काम केले आहे. हे वाचा-रिया चक्रवर्तीला आली Sushant Singh Rajput ची आठवण, शेअर केला UNSEEN VIDEO हिंदूस्तान टाइम्सच्या अहवालानुसार, यामागचं कारण स्पष्ट करताना नवाझुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, 'आजकाल अनेक वेब सीरीज बनवल्या जात असून, त्या पीआर आणि मार्केटिंगच्या जोरावर प्रमोट केल्या जात आहेत. त्यामुळं प्रत्येक वेब सीरिजचे कौतुक होत आहे. परिणामी कोणती मालिका खरोखर चांगली आहे आणि कोणती नाही याबद्दल गोंधळ निर्माण होत आहे. या डिजिटल स्पेसमध्ये (Digital Space) गुणवत्तेपेक्षा प्रमाणाला अधिक महत्त्व आलं आहे. पूर्वीच्या तुलनेत आता त्यात नवीन काहीच नाही. आजकाल बरेच स्टार्स या प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित करत आहेत, परंतु सगळे जातात त्याच्याच पाठी आपणही जायचं अशा झुंडीच्या मानसिकतेवर माझा विश्वास नाही. माझी सद्सद्विवेक बुद्धी मला यासाठी परवानगी देत नाही.' वेबसीरिजमध्ये काम न करण्याचं त्यानं ठरवलं असलं तरी ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपटांमध्ये (Films) तो काम करत राहणार आहे. वेब फिल्म्स कारण त्यामुळे कलाकाराला जागतिक व्यासपीठ मिळतं, त्यामुळं आपण वेब फिल्म्स करत राहणार असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. हे वाचा-VIDEO: वयाच्या 67 वर्षी तरुणींनाही लाजवेल असं वर्कआउट करतेय हृतिकची आई नवाझुद्दीननं सध्या त्याच्या आगामी चित्रपटांवर (Films) लक्ष केंद्रित केलं आहे. त्याच्या आगामी चित्रपटांच्या यादीत 'नो लँड्स मॅन', 'अदभूत', 'टिकू वेड्स शेरू', 'हिरोपंती 2' आणि 'जोगिरा सारा रा रा' यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. मात्र या यादीत सध्या कोणतीही वेब सीरिज नाही. 'मला कंटाळा येऊ नये म्हणून मी हे करतो. मला वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करायला आवडतात. या वर्षी मला प्रेमकथेचे (Romantic) चित्रपट करायचे आहेत,असंही त्यानं सांगितलं.
First published:

पुढील बातम्या