Sacred games 2 : 'या' कारणासाठी रिलीज डेट पुन्हा एकदा ढकलली पुढे

Sacred games 2 : 'या' कारणासाठी रिलीज डेट पुन्हा एकदा ढकलली पुढे

दुसऱ्या सीझनची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी काहीशी निराश करणारी माहिती आता समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जून : वेब सीरिज सेक्रेड गेम्सच्या यशानंतर आता याच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. दुसऱ्या सीझनचं शूटिंग पूर्ण झालं असून हा सीझन लवकरच रिलीज होणार आहे. अशी चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहे. मात्र या दुसऱ्या सीझनची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी काहीशी निराश करणारी माहिती आता समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या सीझनला रिलीज होण्यासाठी आणखी काही काळ जाईल.

'या' कारणासाठी हॉलिवूड अभिनेत्रीनं स्वतःच शेअर केले न्यूड फोटो

 

View this post on Instagram

 

Pichli baar kya bola tha Ganesh bhai ko ? Aukaaat...!!! #GaneshGaitonde2.0 @SacredGames_TV @netflix_in @anuragkashyap72

A post shared by Nawazuddin Siddiqui (@nawazuddin._siddiqui) on

सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन रिलीज होण्यासाठी ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या आधी हा सीझन जून महिन्याच्या अखेर पर्यंत रिलीज होईल अशी चर्चा होती. मात्र आता सैफ अली खान आणि नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्यामुळे या वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. या दोघांच्या शूटिंगचं वेळापत्रक सध्या गच्च असल्यानं प्रदर्शनासाठी वेळ देणं त्यांना शक्य नाही. त्यामुळे आता सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांना वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे.मागील वर्षी या वेब सीरिजचा पहिला सीझन 6 जुलैला रिलीज झाला होता.

भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान सौरव गांगुलीला रणवीर सिंगने केले KISS

 

View this post on Instagram

 

A lone cop, a fabled thug and a rabid city in a race for survival. Sacred Games premieres 6 July.

A post shared by Sacred Games (@sacredgames_tv) on

‘मिड डे’नं दिलेल्या वृत्तानुसार सैफ अली खान सध्या त्याचा आगामी सिनेमा 'जवानी जानेमन' सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. नुकताच तो भारत पाकिस्तान मॅचवेळी मँचेस्टरमध्ये दिसला. तर दुसरीकडे नवाझुद्दीन त्याच्या भावाचं दिग्दर्शन असलेला सिनेमा बोले चुडियाच्या शूटिंगमध्ये बीझी आहे. याच कारणासाठी आता पुन्हा एकदा सेक्रेड गेम्सच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली असून आता प्रेक्षकांना ऑगस्ट महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मात्र नेमकी तारीख अद्याप समजलेली नाही.

Nach baliye 9 : प्रोमोमध्ये उर्वशी ढोलकिया सोबत दिसणारा 'तो' आहे तरी कोण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 07:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading