वेब सीरिज सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागाचा नेटफ्लिक्सकडून खुलासा

वेब सीरिज सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागाचा नेटफ्लिक्सकडून खुलासा

वरूण ग्रोव्हरवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवर नेटफ्लिक्सने क्लीन चीट दिली आहे. सेक्रेड गेम्सचा दुसरा भाग लवकरच रिलीज होणार असल्याचं नेटफ्लिक्सकडून सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 आॅक्टोबर : नेटफ्लिक्सवर गाजलेल्या सेक्रेड गेम्स नावाची वेब सीरिज बरीच चर्चेत आली. सोशल मीडियावर त्यातल्या पात्रांचे फोटोस, मेम्स, व्हायरल झाले. यानंतर सेक्रेड गेम्सचा दुसरा भाग कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सने दुसऱ्या भागाचा प्रोमोसुद्धा प्रसिद्ध केला होता. सेक्रेड गेम्सचा लेखक वरूण ग्रोव्हरवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांनंतर नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्स-2 वेब सीरिज येणार नाही अशी बातमी सर्वत्र पसरत होती.

बॉलिवूडचा प्रसिद्ध लेखक आणि कॉमेडियन वरूण ग्रोव्हरवर लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले आहेत. 2001 मध्ये हे प्रकरण घडल्याचं आरोप करणाऱ्या महिलेनं सांगितलं आहे. त्यावेळेस वरूण वाराणसीच्या हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता. वरूण ग्रोव्हरने एका नाटकाच्या सरावासाठी महिलेला वेगळ्या ठिकाणी बोलवलं आणि तिच्यासोबत गैर वागणूक केल्याचं महिलेनं सांगितले. त्याचबरोबर लैंगिक छळ केल्याचा आरोप वरूणवर करण्यात आला. त्याच्या आरोपांची चौकशी होत नाही तोपर्यंत त्याला कोणतंही काम हाती घेता येणार नव्हतं.

परंतु आता पुन्हा वरूण ग्रोव्हर, अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी एकत्र काम करणार असल्याची माहिती खुद्द नेटफ्लिक्सने दिली आहे. लेखक वरूण ग्रोव्हरवर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर एक स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली. त्या समितीबरोबर झालेल्या चर्चेनंतर नेटफ्लिक्सनं हा निर्णय घेतला. त्यामुळे आता वरूण ग्रोव्हरला नेटफ्लिक्सने क्लीन चीट दिली आहे.

वरूण ग्रोव्हरनं हे आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर वरूणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून चार पानाचं सविस्तर विधान असलेली ट्विट शेअर केली होती. ज्यात त्यानं म्हटलं आहे की, आजपर्यंत मी अशा पद्धतीने कोणालाच स्पर्श केला नाही.

रणवीर-दीपिकाच्या हनिमूनच्या आड आलीय 'ही' व्यक्ती

First published: October 24, 2018, 1:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading