Sacred Games 2 - इस बार त्रिवेदी भी नहीं बचेगा!

Sacred Games 2 - इस बार त्रिवेदी भी नहीं बचेगा!

प्रत्येक प्रोमोमधून सेक्रेड गेम्सचे निर्माते चाहत्यांमध्ये या सीरिजची उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै- बहुप्रतिक्षीत वेबसीरिज 'सेक्रेड गेम्स २' चा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. प्रत्येक प्रोमोमधून सेक्रेड गेम्सचे निर्माते चाहत्यांमध्ये या सीरिजची उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे. या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये गणेश गायतोंडेचा आवाज ऐकू येतोय. पहिल्या भागात खेळाचा खरा मास्टरमाइंड कोण आहे, गणेश गायतोंडेचा खरा उद्देश काय आहे हे सर्व दाखवण्यात आलं तर आता दुसऱ्या भागात क्लायमॅक्स दाखवण्यात येणार आहे. भाग एकप्रमाणे दुसऱ्या भागातही सरताज सिंग या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेताना दिसणार आहे.

सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सीझनच्या पहिल्या भागात गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन सिद्दीकी) सरताज सिंगला (सैफ अली खान) फोन करून मुंबई वाचवण्यासाठी फक्त त्याच्याकडे 25 दिवस उरले असल्याचं सांगतो. यात सगळी मुंबई नष्ट होऊन फक्त त्रिवेदी वाचेल असंही गायतोंडे सरताजला सांगतो. नव्याने प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये, ‘प्रयत्न करून वाचव आपल्या शहराला. पण यावेळी त्रिवेदीही वाचणार नाही.’ असं गायतोंडे बोलताना दिसतो.

 

View this post on Instagram

 

Everything we knew was a lie! #SacredGames2 premieres 15 August.

A post shared by Netflix India (@netflix_in) on

अनुराग कश्यप आणि नीरज घायवान दिग्दर्शित ही वेबसीरिज येत्या 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सरताज स्वतःच्या आयुष्याला त्रासलेला असतो. स्वतःला शोधण्याच्या त्याच्या प्रवासात गणेश गायतोंडेची एण्ट्री होते आणि गायतोंडेचा तिसरा बाप कोण हे कोडं सोडवण्यात आणि शहराला वाचवण्यात तो पुरता अडकतो.

काही दिवसांपूर्वी या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागात गणेश गायतोंडे (नवाझुद्दीन सिद्दीकी) मेलेला दाखवण्यात आला होता. त्यामुळे सरताज सिंहला संकट टळलं असं वाटत होतं. मात्र सीझन 2 च्या ट्रेलरमध्ये मात्र तो परत आलेला दाखवण्यात आला आहे. तो सरताजला एक मेसेज पाठवतो, ज्यात लिहिलेलं असतं की युद्धाची वेळ आली आहे. मात्र हा मेसेज पाठवणारा कोण आहे हे मात्र कोणालाच माहित नसतं. त्यामुळे सरताज या संकटाचा सामना करायला तयार असतो मात्र त्याचा शत्रू कोण आहे हे मात्र त्याला माहीत नसतं. दमदार संवाद आणि नवाझुद्दीनचा तेवढ्याच ताकदीचा अभिनय या ट्रेलरमध्ये पहायला मिळतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in) on

सेक्रेड गेम्स सीझन 2 मध्ये नवाझुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान यांच्या व्यतिरिक्त कल्की कोचलीन आणि रणवीर शोरी यांची नव्यानं एंट्री होत आहे. यातील नवाजुद्दीनच्या सीन्सचं दिग्दर्शन अनुराग कश्यपनं तर सैफ अली खान उर्फ सरताज सिंहच्या सीन्सचं दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केलं आहे. हा सीझन 15 ऑगस्टला रिलीज होत असला तरीही याच दिवशी बॉलिवूडचे तीन बिग बजेच आणि सुपर स्टारर सिनेमे रिलीज होणार आहेत आणि यात आता सेक्रेड गेम्स सीझन 2ची भर पडली आहे. त्यामुळे आता या सर्वांमध्ये वेगळीच चुरस पाहायला मिळाणार आहे.

फक्त 8 मिनिटांच्या अ‍ॅक्शन सीनसाठी प्रभासवर खर्च केले तब्बल एवढे कोटी रुपये!

समीराने शेअर केला मुलीचा पहिला फोटो आणि भावुक होऊन लिहिली ही पोस्ट

कतरिना कैफने बर्थडेला शेअर केले बिकीनी फोटो, आलियाने अशा दिल्या शुभेच्छा

कोंबडा भिडला सापाला, VIDEO व्हायरल

First published: July 16, 2019, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading