Sacred Games 2चं नवं पोस्टर काय सांगतं , गणेश गायतोंडेची पुन्हा दहशत ?

Sacred Games 2चं नवं पोस्टर काय सांगतं , गणेश गायतोंडेची पुन्हा दहशत ?

नवाजुद्दीननं त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन 'सेक्रेड गेम्स 2'चं हे नवं पोस्टर शेअर केलं ज्यात तो नव्या लुकमध्ये दिसत आहे

  • Share this:

मुंबई, 11 मे : प्रसिद्ध वेब सीरिज सेक्रेड गेम्स चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या भागात या सीरिजमधील गणेश गायतोंडे, सरताज सिंह किंवा कुक्कू या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडल्या. पण या सर्वात प्रेक्षकांचा दीर्घकाळ लक्षात राहिला तो म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीननं या सीरिजमध्ये गणेश गायतोंडेची भूमिका साकारली होती. नवाजुद्दीननं त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन 'सेक्रेड गेम्स 2'चं हे नवं पोस्टर शेअर केलं ज्यात तो स्वतः दिसत आहे. मात्र मागच्या भागातील नवाजुद्दीनच्या लुकपेक्षा हा लुक मात्र खूप वेगळा आहे. या पोस्टरमध्ये नवाजुद्दीन सूटमध्ये दिसत आहे. यासोबतच आपल्या पोस्टला नवाजुद्दीननं, 'पिछली बार क्या बोला था गणेश भाई को ? औकात...' असं कॅप्शन दिलं आहे.नेटफ्लिक्स इंडियानेही नव्या पोस्टरमधील सैफ अली खानचा लुक शेअर केला आहे. सैफच्या फोटोला नेटफ्लिक्सनं लिहिलं, जर सरताजला सिस्टिम बदलायची असेल तर त्याला हा खेळ खेळावाच लागेल. या पोस्टरवरील सैफ आणि नवजुद्दीन यांचे लुक पाहिल्यावर लोकांमध्ये या सिनेमाविषयीची उत्सुकता अधिकच वाढलेली दिसत आहे.पहिल्या सीझनप्रमाणे यावेळीही नवाजुद्दीनच्या सीन्सचं दिग्दर्शन अनुराग कश्यपनं तर सैफ अली खान उर्फ सरताज सिंहच्या सीन्सचं दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केलं आहे. या सीझनमध्ये कल्का कोचलीन आणि रणवीर शोरी यांची नव्यानं एंट्री होत आहे. कल्की या सीरिजमध्ये बात्याच्या भूमिकेत दिसणार असून 'या सीरिजसाठी मी खूप उत्सुक आहे' असं कल्किनं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. सेक्रेड गेम्स 2 यावर्षाच्या अखेरपर्यंत रिलीज होईल असं बोललं जात आहे.
 

View this post on Instagram
 

Seek the truth, no matter the cost. #SacredGamesS2


A post shared by Netflix India (@netflix_in) on
 

View this post on Instagram
 

This time, we’re bringing out the big guns. #SacredGamesS2


A post shared by Netflix India (@netflix_in) on
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2019 04:19 PM IST

ताज्या बातम्या