Sacred Games 2 च्या टीझरमध्ये गणेश गायतोंडेने विचारला 'हा' अफलातून प्रश्न

नेटफ्लिक्सच्या Sacred games या वेब सीरिजचा पहिला सीजन तुफान गाजला होता. त्यामुळेच चाहते दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 03:07 PM IST

Sacred Games 2 च्या टीझरमध्ये गणेश गायतोंडेने विचारला 'हा' अफलातून प्रश्न

मुंबई, 30 जुलै- सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर सेक्रेड गेम्स 2 ही वेब सीरिज येत्या 15 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सच्या या वेब सीरिजचा पहिला सीजन तुफान गाजला होता. त्यामुळेच चाहते दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता वेब सीरिज सुरू व्हायला काही दिवसच उरले असताना नुकताच अजून एक टीझर शेअर करण्यात आला. नेटफ्लिक्स इंडियाच्या वेरिफाइड इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवीन व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये नवाजुद्दीन त्याच्या गणेश गायतोंडेच्या व्यक्तिरेखेत दिसत आहे. गणेश सोफ्यावर मेलेल्या अवस्थेत आहे, तर बॅकग्राउंडमधून आवाज येतो की, 'देवाला मानता का?... पण कधी याचा विचार केला आहे का की तो कोणाला मानत असेल?' दरम्यान, मागून गणेशचाच हात त्याच्या मृतदेहावर ठेवलेला दिसतो.

 

Loading...

View this post on Instagram

 

Apun Ganesh bhau ko maanta hai. #SacredGames2 premieres 15th August.

A post shared by Netflix India (@netflix_in) on

व्हिडिओला कॅप्शनमध्ये 'मी तर गणेश गायतोंडेला मानतो' असं लिहिलं आहे. सीरिजच्या दुसऱ्या भागाच्या टीझरमध्ये अनेक संभ्रम निर्माण करण्यात आले आहेत. आतापर्यंत टीझर पाहून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील यात काही शंका नाही. दुसऱ्या सिझनमध्ये काही नवीन पात्र ही दिसत आहेत. पंकज त्रिपाठी यांच्या व्यक्तिरेखेची लांबी वाढविण्यात आली आहे.

गोविंदानं नाकारली 'या' मोठ्या हॉलिवूड सिनेमाची ऑफर, कारण...

डोक्याला शॉट! 'प्लीज फोन करू नका, मी सनी लिओनी नाही'

अनुष्का शर्मानं प्रेग्नेंसीच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली...

SPECIAL REPORT : मॅन Vs वाईल्डमध्ये मोदी झळकणार, डिस्कव्हरीने कधी केलं शूटिंग?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 03:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...