Sacred Games 2: अहं ब्रह्मास्मी! या ठिकाणी आहे गुरुजींचं आश्रम, तुम्हीही जाऊ शकता

या वेब सीरिजमधली लोकांच्या लक्षात राहिली आणि विशेष आवडली गोष्ट म्हणजे गुरुजी यांचं आश्रम

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 04:43 PM IST

Sacred Games 2: अहं ब्रह्मास्मी! या ठिकाणी आहे गुरुजींचं आश्रम, तुम्हीही जाऊ शकता

पाच दिवसांपूर्वी सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला. पहिल्या सीझनमुळे या सीरिजची तरुणाईमध्ये तुफान क्रेझ पाहायला मिळत होती.

पहिल्या सीझनपेक्षा दुसऱ्या सीझनमध्ये अनेक पात्र होती. पण तरीही सीरिजची संपूर्ण कथा ही गणेश गायतोंडे, सरताज सिंग आणि गुरुजी यांच्या भोवतीच फिरत होती.

पंकज त्रिपाठी यांनी गुरुजी हे पात्र साकारलं आहे. पंकजशिवाय हे दुसरं पात्र कोणी साकारूच शकत नव्हतं असा विश्वास आता सेक्रेड गेम्सच्या कट्टर चाहत्यांचा झाला आहे. या सीरिजमध्ये सर्वांचं लक्ष हे फक्त गुरुजी आणि गायतोंडे यांच्याकडेच होतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

याशिवाय अजून एक गोष्ट लोकांच्या लक्षात राहिली आणि विशेष आवडली ती म्हणजे गुरुजी यांचं आश्रम. गुरुजींचं भव्य आश्रम अनेकांना आवडलं. भारतात हे आश्रम नसेलच असा अनेकांचा विश्वास होता. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की हे आश्रम भारतातच असून राजधानी दिल्लीत आहे.

अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वेब सीरिजमध्ये गुरुजींचं आश्रम सांगण्यात आलं ते दिल्लीतलं एक पंचतारांकीत हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये तुम्ही आम्ही कोणीही जाऊ शकतं. अनेकांना सुरुवातीला हा सेट वाटला तर काहींना परदेशातलं एखादं ठिकाण वाटलं.

Loading...

हे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला असलेलं पंचतारांकित हॉटेल आहे. रोसेट हाऊस असं या हॉटेलचं नाव असून सीरिजमधील आश्रमाचा बराचसा भाग या हॉटेलमध्ये चित्रीत करण्यात आला आहे.

तुम्हाला आश्रमाचं मोठं अंगण, मोठमोठ्या भिंती, भव्य दार हे सगळं आठवत असेल तर हे याच रोसेट हाऊस हॉटेलमधलं आहे. गजबजलेल्या दिल्लीत असलेलं हे हॉटेल आतून फार शांत आहे.

सीरिजमध्ये दाखवल्याप्रमाणेच इथे कमालिची शांतता आहे. पण ही शांतता तुम्हाला अनुभवायची असेल तर त्यासाठी खिसा रिकामी करावा लागणार हे नक्की. कारण पंचतारांकित हॉटेलमध्ये शांतता अनुभवण्याचेही पैसे द्यावे लागतात. तुमची आहे का तयारी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2019 04:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...