'एकाच व्यक्तीच्या आयुष्यभर प्रेमात राहणं हा Choice आहे, नियम नाही' : राधिका आपटेची Bold मुलाखत

Sacred Games 2 चं ट्रेलर नुकतंच रीलिज झालं आणि पुन्हा त्यातल्या कॅरॅक्टरची चर्चा रंगात आलेली असतानाच त्यातली अभिनेत्री Radhika Apte हिने एका मुलाखतीत bold विचार व्यक्त केले आहेत. 'माणूस अनेकांच्या प्रेमात पडू शकतो, यावर माझा विश्वास आहे', असं राधिका म्हणाली.

  • Share this:

एकाच व्यक्तीबरोबर प्रामाणिक प्रेमात राहावं हा चॉईस असावा, पण याची सक्ती नसावी, असं स्फोटक विधान मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिने केलं आहे.

माणूस अनेकांच्या प्रेमात पडू शकतो, यावर माझा विश्वास आहे, असं राधिका एका जाहीर मुलाखतीत म्हणाली.

नेहा धुपिया हिच्या BFF with Vogue, Season 3 या कार्यक्रमात राधिकाने प्रेम, लग्न याविषयी आपले बोल्ड विचार व्यक्त केले.

आयुष्यात आपल्याला अनेक लोक भेटतात. त्यांच्याविषयी आकर्षण वाटतं. काही वेळा ते फिजिकल अट्रॅक्शन असतं, काही वेळा नुसतं आपण त्या व्यक्तीचं प्रांजळपणे कौतुक करतो.. आणि मला वाटतं या भावना नैसर्गिक आहेत. सुंदर आहेत. आयुष्याची ही बाजू समजून का घेऊ नये? असं राधिका म्हणाली.

माणसाचे विचार कालानुरूप बदलतात. जसंजसं वय वाढतं, तसे विचारही बदलतात, असं आपलं मत तिने व्यक्त केलं.

Loading...

मला नृत्य आवडतं, अभिनयही आवडतो. तसं मला प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही आवडूच शकतं. मग असं कसं झालं, आता काय होणार असा विचार मी करत नाही. असंही ती म्हणाली.

राधिकानं ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं आहे. ती वर्षातला बराच काळ लंडनमध्ये असते.

मराठी नाटक, चित्रपट अशी वाटचाल करत ती हिंदी चित्रपटांत पोहोचली. पॅडमॅन, पार्च्ड, बदलापूर अशा अनेक चित्रपटात तिने लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या.

ती भूमिकेची गरज लक्षात घेऊन बोल्ड सीनही देते. अभिनयाबरोबरच ती या बोल्डनेसमुळे प्रकाशझोतात राहिली. पार्च्ड सिनेमातही न्यूड सीन दिला.

तिला सध्या वेबसीरीजची क्वीन म्हटलं जातं. नेटफ्लिक्सवरच्या अनेक वेबसीरिज आणि अनेक लघुपट तिने केले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 08:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...