Sacred Game 2 : नवाजुद्दीन आणि सैफबरोबर झळकणार आणखी एक मराठी अभिनेत्री

Sacred Game 2 : नवाजुद्दीन आणि सैफबरोबर झळकणार आणखी एक मराठी अभिनेत्री

Sacred Game 2 मध्ये नवाझुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान यांच्या व्यतिरिक्त कल्की कोचलीन आणि रणवीर शोरी यांच्यासोबतच एक मराठी अभिनेत्रीचीही एंट्री होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : वेब सीरिज सेक्रेड गेम्सच्या यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. दुसऱ्या सीझनचं शूटिंग पूर्ण झालं असून हा सीझन लवकरच रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वीच Sacred Games 2 चा ट्रेलर रिलीज झाला होता त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळला. मागच्या बऱ्याच काळापासून प्रेक्षकांच्या मनात या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाविषयी खूप उत्सुकता होती. अनेकदा त्याच्य़ा रिलीजची तारिखही बदलण्यात आली होती मात्र आता याची प्रतिक्षा संपली आहे. या वेब सीरिजचा दुसरा सीझन येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटला येणार असल्याचं नेटफ्लिक्सच्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरून सांगण्यात आलं आहे.

सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागात गणेश गायतोंडे (नवाझुद्दीन सिद्दीकी) मेलेला दाखवण्यात आला होता. त्यामुळे सरताज सिंहला संकट टळलं असं वाटत होतं. मात्र सीझन 2 च्या ट्रेलरमध्ये मात्र तो परत आलेला दाखवण्यात आला आहे. तो सरताजला एक मेसेज पाठवतो, ज्यात लिहिलेलं असतं की युद्धाची वेळ आली आहे. मात्र हा मेसेज पाठवणारा कोण आहे हे मात्र कोणालाच माहित नसतं. त्यामुळे सरताज या संकटाचा सामना करायला तयार असतो मात्र त्याचा शत्रू कोण आहे हे मात्र त्याला माहीत नसतं. दमदार संवाद आणि नवाझुद्दीनचा तेवढ्याच ताकदीचा अभिनय या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो.

VIDEO : लंडनवरून परतली सारा, पिकअप करायला कार्तिक पोहोचला एअरपोर्टवर

सेक्रेड गेम्स सीझन 2 मध्ये नवाझुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान यांच्या व्यतिरिक्त कल्की कोचलीन आणि रणवीर शोरी यांची नव्यानं एंट्री होत आहे. याशिवाय यात आणखी एक मराठी अभिनेत्रीचीही एंट्री होणार आहे. या आधी राजश्री देशपांडे ही मराठी अभिनेत्री पहिल्या सीझनमध्ये दिसली होती. त्यानंतर आता अभिनेत्री स्मिता तांबे या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्मिता या वेब सीरिजमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. स्मितानं या आधी ‘जोगवा’, ’72 मैल’, ‘परतु’ या मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.

The Lion King मधून शाहरुखच्या मुलाचा डेब्यू, प्रेक्षकांना आर्यनच्या आवाजाची भुरळ

 

View this post on Instagram

 

#MyNameIsSheela Promotion Day 1 At @erosnow office ❤️💛

A post shared by Smita Tambe (@smitatambe) on

सेक्रेड गेम्स सीझन 2 नवाजुद्दीनच्या सीन्सचं दिग्दर्शन अनुराग कश्यपनं तर सैफ अली खान म्हणजेच सरताज सिंहच्या सीन्सचं दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केलं आहे. हा सीझन 15 ऑगस्टला रिलीज होत असला तरीही याच दिवशी बॉलिवूडचे तीन बिग बजेट आणि सुपर स्टारर सिनेमे रिलीज होणार आहेत आणि यात आता सेक्रेड गेम्स सीझन 2ची भर पडली आहे. त्यामुळे आता या सर्वांमध्ये वेगळीच चुरस पाहायला मिळाणार आहे.

पत्रकार वाद प्रकरणी कंगनाची माफी नाहीच, बहिणीच्या Twitter वरून जाहीर केला VIDEO

=================================================================

VIDEO: आषाढी एकादशीनिमित्त पंढरी सजली

First published: July 11, 2019, 2:59 PM IST

ताज्या बातम्या